बूथ हॉस्पिटलला भरीव रकमेचा धनादेश! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, May 24, 2021

बूथ हॉस्पिटलला भरीव रकमेचा धनादेश!

 बूथ हॉस्पिटलला भरीव रकमेचा धनादेश!

रेसिडेन्सियलच्या माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार!


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शहरातील रेसीडेन्सील हायस्कूलच्या 1997 वर्षीच्या माजी विद्यार्थी मित्रांनी मागील दोन वर्षांपासून कोरोना रुग्णांची सेवा करणार्‍या इव्हॅन्जलिन बूथ हॉस्पिटलला स्वखुशीने एक भरीव स्वरुपाच्या रकमेचा धनादेश नुकताच दिलाय. काल (दि.23) या छोटेखानी कार्यक्रमामध्ये बूथ हॉस्पिटलचे व्यवस्थापक डॉ.  देवदान कळकुंभे यांच्याकडे सदर धनादेश सुपूर्द करण्यात आला.याप्रसंगी सतिष ओहोळ, गोरख सांगळे, प्रकाश रायकर, प्रशांत गायकवाड, अमित इथापे, निलेश म्हस्के, अमोल पालवे, जयंत मुळे, सचिन एकलहरे आदी उपस्थित होते. बूथ हॉस्पिटलचे व्यवस्थापक देवदान कळकुंभे यांनी माजी विद्यार्थ्यांच्या या मदतीबद्दल धन्यवाद दिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here