तारकपूर रोड ते सर्जेपुरा रोडला जोडणार्‍या डीपी रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, May 24, 2021

तारकपूर रोड ते सर्जेपुरा रोडला जोडणार्‍या डीपी रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात

 तारकपूर रोड ते सर्जेपुरा रोडला जोडणार्‍या डीपी रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात

नगर शहरात नवीन डीपी रस्त्याची भर-आ.संग्राम जगताप


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः  शहरातील डीपी रस्त्याच्या विकास कामाला प्राधान्यक्रम दिला आहे. राज्य शासनाकडे शहरातील डीपी रस्त्यांचा विकास कामाच्या निधीसाठी प्रस्ताव पाठवला असून मंजुरीसाठी प्रयत्नशील आहे. तारकपूर रोड ते सर्जेपुरा रामवाडी पेट्रोल पंप पर्यंत जोडणारा रस्त्याची नवीन डीपी रस्त्याची निर्माण केली असून दळणवळणाच्या दृष्टीने हा रस्ता महत्त्वाचा ठरणार आहे,केंद्र व राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती कोविड मुळे बिकट झाली असली तरी शहर विकासासाठी निधी आणला जाईल नगरसेवक मुदस्सर शेख यांनी या रस्त्याच्या कामाच्या मंजुरीसाठी प्रयत्न केले होते.या रस्त्याच्या विकास कामांमुळे या परिसराच्या विकासाला चालना मिळाली आहे तसेच शहराच्या डीपी रस्त्यांमध्ये या नवीन डीपी रस्त्याची भर पडली असल्याचे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
प्रभाग क्रमांक 10 चे नगरसेवक मुदस्सर शेख यांच्या प्रयत्नातून तारकपूर ते सर्जेपुरा रामवाडी पेट्रोल पंपा पर्यंतच्या डीपी रस्त्याच्या कामाची पाहणी आ.संग्राम जगताप यांनी केली यावेळी यावेळी स्थायी समिती सभापती अविनाश घुले,मा.नगरसेवक सचिन जाधव,ड.प्रसन्ना जोशी, साहेबांन जागीरदार आदींसह या परिसरातील नागरिक यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना नगरसेवक मुदस्सर शेख म्हणाले की, या प्रभागाचा कायापालट करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे, आ.संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकास कामे मंजूर आहेत.सर्जेपुरा चौक ते कोठला स्टॅन्ड पर्यंत रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहेत तसेच या रस्त्याला जोडणारा तारकपूर डीपी नवीन रस्ताची निर्मिती केली आहे, या रस्त्याची काम देखील सुरु आहे.या प्रभागाच्या विकासासाठी मी प्रयत्नशील आहे असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here