ऑक्सिजनयुक्त 1 हजार वृक्षांची करणार लागवड- जाधव - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 31, 2021

ऑक्सिजनयुक्त 1 हजार वृक्षांची करणार लागवड- जाधव

 ऑक्सिजनयुक्त 1 हजार वृक्षांची करणार लागवड- जाधव

ओपन आर्म्स नगर शहरात पर्यावरण संवर्धनाची संकल्पना राबवणार

नगर- वृक्षारोपण व संवर्धनाची गरज ओळखून नगर शहरामध्ये ओपन आर्म्स संघटनेच्या माध्यमातून ऑक्सीजन युक्त 1 हजार झाडे लावणार असून, नगर शहरातील युवकांना या उपक्रमामध्ये सहभागी करून घेतले जाणार आहे.वृक्षसंवर्धनाची लोकचळवळ उभी करणे गरजेचे आहे कारण कोरोना संकटकाळामध्ये ऑक्सिजन हा किती महत्त्वाचा घटक आहे याचे महत्त्व आता आपल्याला समजले आहे. कोरोना रुग्णांना कृत्रिम पद्धतीने बनविला जाणार ऑक्सिजन आपल्याला विकत घ्यावा लागत आहे. यासाठी नैसर्गिक ऑक्सिजन मिळण्यासाठी वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे.वातावरणामध्ये दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिगडला असल्यामुळे बदल होत आहे. ऋतुमाना मध्ये देखील बदल झालेला दिसत आहे, यासाठी प्रत्येक नागरिकांनी व युवकांनी एक झाड लावून त्याचे संवर्धन करण्याचा निश्चय अंगी बाळगला पाहिजे असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष शुभम जाधव यांनी व्यक्त केले.
रासने नगर परिसरामध्ये ओपन आर्म्स संस्थेच्या वतीने नगर शहरामध्ये 1 हजार झाडे लावण्याचा शुभारंभ करण्यात आला यावेळी संघटनेचे अध्यक्ष शुभम जाधव, गणेश शिंदे, परेश मुनोत, कृष्णा सरोदे, प्रेम वछतानी, ज्येष्ठ नागरिक बलभीम पांडव, शेख रहीम, पांडुरंग भिसे, नितिन रासने, प्रसाद बनकर, सागर साईनाथ शेडळे आदींसह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment