श्रमिक नगर येथे श्री बालाजी मंदिर मध्ये लसीकरण केंद्राचे शुभारंभ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, May 21, 2021

श्रमिक नगर येथे श्री बालाजी मंदिर मध्ये लसीकरण केंद्राचे शुभारंभ

 श्रमिक नगर येथे श्री बालाजी मंदिर मध्ये लसीकरण केंद्राचे शुभारंभ

श्रमिक नगर येथे श्री बालाजी मंदिरात लसीकरण केंद्राचे शुभारंभ महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. समवेत  भाजपा जिल्हाध्यक्ष नगरसेवक भय्या गंधे नगरसेवक मनोज दुलम मल्हार गंधे सतीश शिंदे विनोद म्याना शंकर येमुल विलास सगम.


अहमदनगर ः
वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक ठिकाणी नागरिकांना लस देण्यासाठी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे आज नगर मधील श्रमिक नगर भागात बालाजी मंदिर मध्ये नागरिकांना लस देण्यासाठी लसीकरण केंद्राचे शुभारंभ महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी याप्रसंगी महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले या श्रमिक नगर भागामध्ये नागरिकांना दररोज लस उपलब्ध होईल. लस कमी पडणार नाही.          
भाजपा जिल्हाअध्यक्ष भैय्या  गंधे म्हणाले आज नगरसेवक मनोज दुलम यांच्या प्रयत्नातून या श्रमिक नगर मध्ये लसीकरण केंद्र उभारण्यात आले आहे मनोज  दुलम यांनी या कोविड च्या काळात आपल्या स्वतःचे व कुटुंबाचे काळजी न करता सामाजिक बांधिलकी कायम जपली आहे नागरिकांना कायम त्यांनी कोविडच्या कोणतेही रुग्णास त्यांना कायम सर्व परी मदत केली आहे त्यांच्या अंत्यसंस्कार मध्ये कोणती अडचण येऊन दिली नाही असे राजकीय लोक आपल्याला खूप कमी पाहायला मिळतात त्यामुळे एक आदर्श घडवण्याचं काम या ठिकाणी मनोज दुलम यांनी केले आहे.  
 याप्रसंगी मल्हार गंधे ,सतीश शिंदे विनोद म्याना शंकर येमुल विलास सगम अशोक ईपलपेल्ली राजू  येमुल संजय कोडम डॉक्टर एस चेलवा सह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment