स्व.आमदार वसंतराव झावरे पाटील कोव्हिड सेंटरमध्ये विश्वशांती लोककल्याण यज्ञ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, May 21, 2021

स्व.आमदार वसंतराव झावरे पाटील कोव्हिड सेंटरमध्ये विश्वशांती लोककल्याण यज्ञ

 स्व.आमदार वसंतराव झावरे पाटील कोव्हिड सेंटरमध्ये विश्वशांती लोककल्याण यज्ञ

वैश्विक शांतीसाठी होम-हवन करणारे टाकळी ढोकेश्वर येथील एकमेव कोविड  सेंटर

कोरोनारुपी वैश्विक संकट दूर व्हावे ही  ईश्वराकडे प्रार्थना : सुजित झावरेनगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी 

सध्या देशावर कोरोनाचे आलेले संकट लवकर दूर व्हावे, सर्वांना निरामयः आरोग्य लाभावे यासाठी टाकळी ढोकेश्वर येथील माजी आमदार स्व. वसंतराव झावरे पाटील कोव्हिड सेंटरमध्ये आज (गुरुवारी ) विश्वशांती लोककल्याण यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यात्मातून आरोग्याकडे या संकल्पनेतून या यज्ञाने आयोजन करण्यात आले असून यावेळी कोरोनारूपी आलेले हे वैश्विक संकट दूर व्हावे अशी प्रार्थना करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित पाटील झावरे यांनी दिली. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या संकल्पनेतून टाकळीढोकेश्वर येथे 300 बेडचे माजी आमदार स्व. वसंतराव झावरे पाटील यांच्या नावाने कोव्हिड सेंटर सुरू करण्यात आले आहे. येथे दाखल झालेले अनेक रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यांनीही या सेंटरमुळे आपणास आधार मिळाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

रुग्णांना सेवा देण्याबरोबरच अध्यात्मातून निरामय आरोग्याकडे या संकल्पनेतून सुजित पाटील झावरे यांनी कोटोनाचे संकट टळावे यासाठी येथील कोव्हिड सेंटरमध्ये विश्वशांती यज्ञाचे आज गुरुवारी आयोजन केले आहे. या संदर्भात माहिती देताना सुजित झावरे पाटील म्हणाले की, होमहवन ही अंधश्रद्धा नसून अग्नीद्वारे परमेश्वर व वैश्विक शक्तीला आवाहन करण्याचीही संकल्पना आहे. पूर्व इतिहास पाहता वेगवेगळ्या राज्यांवर आलेले संकट टळण्यासाठी त्या काळातील राज्यकर्त्यांनी होमहवन केल्याचे दाखले आहेत. पर्जन्य यज्ञाद्वारे पाऊस पडत असल्याचासंदर्भ ज्ञानेश्वरी ग्रंथातही आहे.

सध्या सर्वत्र कोरोनाचे वैश्विक संकट आलेले आहे. हे संकट दूर व्हावे यासाठी विश्वशांती यज्ञाचे आयोजन करण्यात आले आले आहे. वैश्विक शांतीसाठी होमहवन करणारे टाकळी ढोकेश्वरचे कोव्हिड सेंटर हे एकमेव असल्याचेही झावरे पाटील यांनी सांगितले. आज (गुरुवारी) सायंकाळी 5 वाजता 11 ब्रह्मवृंदाद्वारे या यज्ञात सुरुवात होऊन विविध प्रकारच्या वनौषधींची समिधा यज्ञात देण्यात आली. यावेळी नवग्रहशांती व रुद्राभिषेक करून भगवान शंकटाला शरण जाऊन हे संकट टळावे अशी प्रार्थना करत ईश्वराला साकडे घालण्यात आले असल्याचे सुजित पाटील झावरे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here