आ. लंकेंच्या कोविड केअर सेंटरला आर्थिक मदत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 31, 2021

आ. लंकेंच्या कोविड केअर सेंटरला आर्थिक मदत

 आ. लंकेंच्या कोविड केअर सेंटरला आर्थिक मदत

सावेडीच्या क्रिस्टल हॉस्पिटलचा उपक्रम


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः
करोनाचे संकट वैद्यकीय उपचार व मदत कार्याच्या जोरावर आपण परतून लावत आहोत. सर्वसामन्य जनतेला सर्व स्तरातून मदत मिळाली आहे. करोना काळात आ. निलेश लंके यांनी कोविड केअर सेंटर सुरु करत सर्वसामान्य जनतेला मोठा आधार दिला आहे. जनसामान्यांची सेवा होणार्‍या या कार्यास फुल ना फुलाची पाकळी म्हणून आकार हजार रुपयंची मदत दिली आहे, असे प्रतिपादन मोहटे जगदंबादेवी ट्रस्टचे विश्वस्त व क्रिस्टल हॉस्पिटलचे संचालक डॉ. ज्ञानेश्वर दराडे यांनी केले.
भाळवणी येथील आ. निलेश लंके यांच्या कोविड केअर सेंटरला सावेडी येथील क्रिस्टल हॉस्पिटलच्या वतीने रुग्णसेवेसाठी आकार हजार रुपयांची मदत देण्यात आली. यावेळी मोहटादेवीची प्रतिमा देवून आ. निलेश लंके यांनी केलेल्या सेवाकार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी मधुमेह  व ह्दयरोग तज्ञ डॉ. जितेन्द्र ढवळे, क्रिस्टल हॉस्पिटलचे संचालक कांचन पालवे, गणेश फसले, अरविंद वाबळे, कृष्णा आडोळे आदी उपस्थित होते.
यावेळी आ. लंके यांनी केलेल्या मदती बद्दल सर्वांचे आभार मानून येथे चालू असलेल्या कार्याची माहिती दिली.


No comments:

Post a Comment