नगर तालुक्यात पेरणीपूर्व मशागतीला वेग 60 हजार हेक्टरवर खरिपाची लागवड होण्याची शक्यता - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, May 31, 2021

नगर तालुक्यात पेरणीपूर्व मशागतीला वेग 60 हजार हेक्टरवर खरिपाची लागवड होण्याची शक्यता

 नगर तालुक्यात पेरणीपूर्व मशागतीला वेग

60 हजार हेक्टरवर खरिपाची लागवड होण्याची शक्यता

तालुक्यातील मंडल निहाय पावसाची नोंद - शनिवारी तालुक्यात 27 .9 मि .मी. पावसाची नोंद करण्यात आली ः नालेगाव - 12 .8, सावेडी -17, कापुरवाडी -18 .8, केडगाव -30 .3, भिंगार-21 .8, नागापुर -10, जेऊर -0, चिंचोडी पाटील -50 .8, वाळकी-66 .8, चास -36 .8, रूईछत्तीशी - 42 .5

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः नगर तालुक्यात शनिवारी झालेला रोहिणी नक्षत्रातील पहिलाच पाऊस समाधानकारक झाल्यामुळे पेरणीपूर्व मशागतीला वेग आला आहे. शेतकर्‍यांनी खरीप पिकाच्या लागवडीसाठी आवश्यक त्या काकर्‍या पाळी घालण्यास सुरुवात केली आहे.
उन्हाळ्यात शेत नांगरणी, बांध बंदिस्ती, सपाटीकरण आदी कामे करून घेण्यात आली. यावर्षी वेळेवर रोहिनी बरसल्या असून मृग नक्षत्रातील आणखी एक दोन पाऊस होताच मूग, सोयाबीन, मका, कपाशी, तूर यांच्या लागवडी मोठया प्रमाणावर होणार आहेत.
तालुक्यात जवळपास सर्वत्र मान्सुन पुर्व पावसाने सलामी दिली असून वाळकी, चिंचोडी पाटील, रुई छत्तीशी मंडलात समाधानकारक पावसाची नोंद झाली. यामुळे साकतखुर्द, वाटेफळ, दहिगाव, शिराढोण, वाळुंज पारगाव, तांदळी आदी परिसरात पेरणीपूर्व मशागतीला वेग आला आहे.
 मागील वर्षी नगर तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली होती. यंदाही समाधानकारक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात होता. यानुसार तालुक्यात शनिवारी रात्री जोराच्या वार्‍यासह रोहिणी बरसल्या. पावसाने दमदार सुरूवात केल्याने शेतकरी सुखावला आहे. तालुक्यात जवळपास 60 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांच्या पेरणीचे नियोजन असुन यंदा प्रथमच मुग व सोयाबीनच्या लागवडीत दुपटीने वाढ होण्याची शक्यता आहे
 शनिवारच्या पावसात गावोगावच्या नदया- नाल्यांमधून पाणी वाहिले असले तरी लगेच त्या पाण्याचा निचरा झाला. तर खरीप पेरणीसाठी आणखी एक दोन पावसाची गरज आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here