दुधाचे भाव घसरले, व्यावसायिक संकटात..... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 31, 2021

दुधाचे भाव घसरले, व्यावसायिक संकटात.....

 दुधाचे भाव घसरले, व्यावसायिक संकटात.....


नगरी दवंडी/प्रतिनिधी
गुंडेगाव ः शेतीबरोबर जोडधंदा दुध व्यवसाय. प्रामुख्याने गुंडेगाव परीसरात केला जातो, नेहमीच दुष्काळी पट्टा, जिरायती शेती, पावसावर आधारावर शेती आसल्याने शेती बरोबर  दुग्ध व्यावसाय प्रामुख्याने  आर्थिक दृष्टीने महत्वाचा आहे पण हा व्यावसाय सध्या मेटाकुटीस आला आसून कोरोनाविषाणू मुळे लॉकडाऊन मुळे गाईच्या दुधाचे भाव उतरल्याने आर्थिक घडी कोलमडली* आसून 22ते23रुपये प्रति लीटर भाव मिळत आसून यामध्ये खर्च निघत नाही, पशुखाद्य चे 400ते 500 रुपयांनी वाढले आहे तसेच पशुखाद्य कडब्याच्या  दरात वाढ झाली आसून  आधीच संकटात सापडलेला गुंडेगाव येथील  दुध उत्पादकांमध्ये चिंता व्यक्त केली आहे.
        राज्यात दूध उत्पादक संघाकडून गावपातळीवर सहकारी दुध संस्थांमार्फत दूध संकलन केले जाते. त्यासोबतच काही खासगी कंपन्या शेतकर्‍यांकडून दुध खरेदी करतात.लॉकडाऊनपूर्वी दुग्ध संघाकडून उत्पादकांना 28ते 29 रुपये प्रति लिटर भाव मिळत होता. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर शासनाकडून दुधाच्या भावात घसरण झाली. आज 22 ते 23 रुपये प्रति लिटर भावाने संघ दूध खरेदी होत आहे.

     जगावरती कोरोनाचे संकट आल्यामुळे दुधाची मागणी घटली आहे. गाईच्या दुधाचा भाव 18 ते 23 रुपये लिटर झाला आहे. त्यामुळे दुभत्या जनावरांच्या किमती मातीमोल झाल्या आहे. एकीकडे दुधाला दर नसल्याने गाई सांभाळने परवडेना तर दुसरीकडे गाई घेण्यासाठी ग्राहक नसल्याने गाईचे दर कोसळ्याने गाई विकता येईना आशी शेतक-याची अवस्थता झाली आहे आशी प्रतिक्रिया गुंडेगाव येथील दुध व्यावसायिक यांनी व्यक्त केली आहे.
   - संतोष सदाशिव धावडे
दुध व्यावसायिक गुंडेगाव

No comments:

Post a Comment