सोशल मीडियावर कोरोनाला घाबरतील अशा पोस्ट टाकणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 5, 2021

सोशल मीडियावर कोरोनाला घाबरतील अशा पोस्ट टाकणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी.

 सोशल मीडियावर कोरोनाला घाबरतील अशा पोस्ट टाकणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी.  



नगरी दवंडी

                                                                               अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाची दुसरी लाटेमध्ये महाराष्ट्रातील लोकांच्या मनामध्ये अतिशय भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि सोशल मीडियावर कोरोनाला घाबरतील अशा बातम्या व्हिडीओ क्लिप व्हायरल होत आहे या ठिकाणी एवढे लोक मृत्यू झाले त्या ठिकाणी एवढे मृत्यूमुखी पडले कोरोना किती डेंजर आहे हे लोक दाखवतात आणि त्यामुळे जे कोणी आपले बांधव आहेत कोरोना पेशंट असतील किंवा ज्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत अशा लोकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते आणि आज महाराष्ट्रात 50 ते 60 टक्के लोक हे कोणाला घाबरून मृत्युमुखी पडलेले आहे हे पाहता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कर्जत तालुका अध्यक्ष विशाल भुसारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे की सोशल मीडियावर जर कोणी कोरोना संदर्भात मृत्युमुखी पडलेल्या व्हिडिओ सोशल मीडिया, व्हाट्सअप, फेसबुकला जर कोणी ठेवत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहेत.                                                                        कोरोना बाधित रुग्ण हे रुग्णालयांमध्ये किंवा किविड सेंटर मध्ये सर्वांकडे मोबाईल आहे तिथे व्हिडिओ वायरल केलेले क्लिपा पाहून त्यांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते कोरोणाच्या विरोधात लढण्याची व्यतिरिक्त ते घाबरून जातात असे होऊ नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment