टाळेबंदीत सुरु असलेले अनाधिकृत मोबाईल टॉवरचे काम पाडले बंद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 5, 2021

टाळेबंदीत सुरु असलेले अनाधिकृत मोबाईल टॉवरचे काम पाडले बंद

 टाळेबंदीत सुरु असलेले अनाधिकृत मोबाईल टॉवरचे काम पाडले बंद

 पिपल्स हेल्पलाईनच्या पाठपुराव्याला यश जागा मालकास पोलीसांची नोटीस

 



नगरी दवंडी


अहमदनगर(प्रतिनिधी)- टाळेबंदीचा गैरफायदा घेऊन धर्माधिकारी मळा परिसरात अनाधिकृत फाईव्ह जी मोबाईल टॉवर उभारण्याचे प्रगतीपथावर असलेले काम पिपल्स हेल्पलाईन संघटनेच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशार्‍यानंतर बंद पाडण्यात आले आहे. सदर मोबाईल टॉवरचे काम बंद केल्याने नागरिकांनी पुकारलेला रास्ता रोको आंदोलन स्थगित केली असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.  

धर्माधिकारी मळा परिसरात कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता बांधण्यात येत असलेल्या मोबाईल टॉवरला आरोग्यावर दुष्परिणाम होण्याच्या भितीने स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला होता. सर्व नियम धाब्यावर बसवून मोबाईल टॉवरचे काम सुरु होते. सदर टॉवरचे काम बंद करण्यासाठी संघटनेने स्थानिक नागरिकांसह प्रेमदान चौकात रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनाची दखल घेत तोफखाना पोलीस स्टेशनचे पो.नि. सुनिल गायकवाड व सहा. पो.नि. सुरसे यांनी टॉवरचे जागा मालक आनंद कानडे यांना बोलावून घेतले. सदर कामासाठी जिल्हाधिकारी व मनपा प्रशासनाची परवानगी नसल्याने सुरु असलेले अनाधिकृत फाईव्ह जी मोबाईल टॉवरचे काम बंद करण्याची नोटीस बजावली. तर मनपा कर्मचार्‍यांनी देखील मोबाईल टॉवरची पहाणी करुन पंचनामा केला.

 इलेक्ट्रिक मॅग्नेटिक लहरीचा दुष्परिणामाने शंभर मीटरवर राहत असलेल्या नागरिकांना गंभीर आजार होण्याची शक्यता आहे. धर्माधिकारी मळा परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. फक्त पैश्याच्या लोभापायी हे मोबाईल टॉवर उभारण्यात येत होते. नागरिकांच्या जागृकतेमुळे या टॉवरचे अनाधिकृत काम हाणून पाडण्यात आले असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. तर सदर ठिकाणी भविष्यात टॉवर उभे राहू नये, यासाठी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांकडे मागणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मोबाईल टॉवरचे काम थांबविण्यासाठी अ‍ॅड. गवळी, ललीता गवळी, वसुधा शिंदे, प्रकाश हजारे, माधवी दांगट, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ओम कदम, शाहीर कान्हू सुंबे, अशोक भोसले आदी प्रयत्नशील होते.

No comments:

Post a Comment