उपनगरामध्ये एकच लसीकरणकेंद्र असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी, नवीन लसीकरण केंद्र सुरु करण्याची मागणी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 5, 2021

उपनगरामध्ये एकच लसीकरणकेंद्र असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी, नवीन लसीकरण केंद्र सुरु करण्याची मागणी.

 उपनगरामध्ये एकच लसीकरणकेंद्र असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी,  नवीन लसीकरण केंद्र सुरु करण्याची मागणी.नगरी दवंडी                                                                             अहमदनगर (प्रतिनिधी)- बालिकाश्रम रोड भुतकरवाडी जिल्हा परिषद शाळा येथे नागरिकांसाठी लसीकरण केंद्र सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन नगरसेविका वंदना विलास ताठे यांनी महापौर बाबासाहेब  वाकळे यांच्याकडे केली.                  

 भुतकरवाडी जिल्हा परिषद शाळा येथे नागरिकांसाठी लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे सावेडी, शिंदे मळा, ताठे मळा, फुलारी मळा, धर्माधिकारी मळा, जय अजय आपारमेंट, आराधना कॉलनी, भिंगारदिवे मळा, ताठे नगर, बोरुडे मळा, सुडके मळा, जाधव मळा, बागडे मळा, लेडकर मळा, महाविर नगर आधी परिसरामध्ये मोठी लोकसंख्या असून महानगरपालिकेचे लसीकरण केंद्र सावेडी टीव्ही सेंटर येथे आहे उपनगर मध्ये एकच लस्सी केंद्र असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते काही वयस्कर ज्येष्ठ नागरिक यांना लांबून यावे लागते रांगेत उभे राहून सुद्धा लस वेळेत मिळत नाही त्यामुळे महिला वर्ग व नागरिक यांनी लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी माझ्याकडे केली असता. भुतकरवाडी शाळेत मनपाचे लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे व येथे लागणारे साहित्य इलेक्ट्रिकल मेंटेनन्स आदी कामे करण्यासाठी नगरसेविका ताठे यांच्या विकास निधीतून 2 लाख रुपये खर्च करण्यात यावा व येथे लवकरात लवकर लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी नगरसेविका सौ.वंदना विलास ताठे यांनी केली आहे

No comments:

Post a Comment