सामाजिक संघटनांकडून नगरमध्ये आरोग्य जागृतीसाठी भरीव कार्य : आ. जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, May 27, 2021

सामाजिक संघटनांकडून नगरमध्ये आरोग्य जागृतीसाठी भरीव कार्य : आ. जगताप

 सामाजिक संघटनांकडून नगरमध्ये आरोग्य जागृतीसाठी भरीव कार्य : आ. जगताप

अँटीबॉडी तपासणी शिबिरात 101 जणांची तपासणी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः करोना काळात प्रत्येकाने आरोग्याबाबत सजग राहण्याची गरज आहे. अँटिबॉडी तपासणीतून आपल्याला शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीची माहिती होण्यास मदत होते. नगरमध्ये सामाजिक संघटना या तपासणीसाठी पुढाकार घेऊन आरोग्य जागृती करत आहेत. या उपक्रमांमुळे नगर शहरात करोना आटोक्यात येण्यास मदत होत आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
नगर मधील सकल राजस्थानी युवा मंच, बडीसाजन ओसवाल युवक संघ, अहमदनगर होलसेल जॉगरी असोसिएशन,जय आनंद महावीर युवक मंडळ,सी.ए.असोसिएशन, नगर,जिनगर बॉईज,वर्धमान युवा संघ, माहेश्वरी युवा संघठन,महावीर प्रतिष्ठाण या संघटनांनी शहरात अँटीबॉडी तपासणी अभियान सुरु केले आहे. याअंतर्गत नूतन गुजराती समाजासाठी अँटीबाडी तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी आ.जगताप बोलत होते. याप्रसंगी धनेश कोठारी, अमित मुथा, निरज काबरा, श्याम भुतडा, पुरूषोत्तम पटेल, महेंद्र चंदे, जेठाभाई पटेल, जिग्नेश सोळंकी, विपुल शहा, देवांग मेहता, नरसीभाई पटेल, कांतीभाई पटेल, मंजीभाई पटेल, आदित्य संघराजका, जिग्नेश कांकरिया, जिमी विरानी, संजय भंडारी, हितेन मेहता आदी उपस्थित होते.
धनेश कोठारी म्हणाले, अँटिबॉडी तपासणी अतिशय महत्त्वाची असून या तपासणीतून करोना होऊन गेला की नाही हे समजते. अँटीबॉडीचे प्रमाण कमी असल्यास लसीकरण करणे आवश्यक असल्याचे समजते. शहरात आतापर्यंत अशा शिबिरातून अनेकांची अँटीबॉडी तपासणी करण्यात आली आहे. चांगले आरोग्य हाच आजच्या काळाचा मंत्र असून त्यासाठी सामाजिक संघटना सातत्याने प्रयत्नशील आहेत. या शिबिरात 101 जणांची अँटीबॉडी तपासणी करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here