तारकपूर येथे लसीकरण केंद्र सुरु करा विनायक राज प्रतिष्ठानची मागणी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, May 27, 2021

तारकपूर येथे लसीकरण केंद्र सुरु करा विनायक राज प्रतिष्ठानची मागणी.

 तारकपूर येथे लसीकरण केंद्र सुरु करा विनायक राज प्रतिष्ठानची मागणी.


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः उपनगर सावेडी भागात मोठी लोकवस्ती आहे. या परिसरातील लोकांना सध्या लसीकरणासाठी लांब अंतरावर जावे लागते त्यात सर्वांकडे गाडी उपलब्ध असेल असे नाही. तर नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी तारकपूर भागात अन्यथा गुलमोहर रोड परिसरात लसीकरण केंद्र सुरु करण्याचा मागणीचे निवेदन विनायक राजं प्रतिष्ठाणच्या वतीने मनपा आरोग्य अधिकारी बोरगे यांना विपुल वाखुरे पाटील यांनी दिले. यावेळी प्रशांत दारकुंडे, शोहेब शेख उपस्थित होते. दिलेल्या निवेदनात असे म्हंटले याभागात लसीकरण केंद्र सुरु करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे तुम्ही आमची जागा भाडे न देता लसीकरणासाठी 6 महिने घ्या आणि महापालिकेच्या नावाने लसीकरण सुरु करा प्रेरणा आरर्केड,कोर्टयार्ड बिल्डींग तारकपूर बसस्थानक समोर अन्यथा गुलमोहर रोड वरील आनंद विद्यालय या शाळेमध्येही तुम्हाला जागा उपलब्ध करून देऊ शकतो. तरीही आपण दखल घेवून लवकरात लवकर लसीकरण केंद्र सुरु करावे. जेणे करून लसीकरणाच्या कार्याला गती मिळेल आणि नागरिकांचा जीव कोरोनापासून वाचवण्यात मदत मिळेल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here