रुपेवाडी येथे गुंडांची दहशत; कोवीड काळात दिव्यांग शेळके यांना मानसीक त्रास - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, May 27, 2021

रुपेवाडी येथे गुंडांची दहशत; कोवीड काळात दिव्यांग शेळके यांना मानसीक त्रास

 रुपेवाडी येथे गुंडांची दहशत; कोवीड काळात दिव्यांग शेळके यांना मानसीक त्रास

तहसीलदारांना निवेदन ; राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडून न्यायाची अपेक्षा अन्यथा अमर उपोषणाचा इशारा

नगरी दवंडी/प्रतिनिधी
पाथर्डी ः तालुक्यातील रुपेवाडी गावातील काही गुंडांनी शेळके कुटूंब कोरोना पॉझीटीव्ह असल्याने वाळीत टाकत त्यांच्या घराकडे जाण्याचा रस्ता बंद केला व शिवीगाळ केली या प्रकरणी पोपट शेळके यांनी तहसीलदारांमार्फ राज्यमंंत्र  ना. बच्चु जिल्हा अधिकारी साहेब, अहमदनगर, पोलिस अध्यक्षिक साहेब, कार्यालय, अहमदनगर, मुख्य कार्यकारी अधिकारी, पालिस निरक्षक, पाथर्डी, गटविकास अधिकारी, पंचायत समिती पाथर्डी, तलाठी मिरी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कार्यालय, शंकरवाडी-रुपेवाडी  आदींना निवेदनद्वारे कायमचा घराकडे जाण्याचा रस्ता मिळण्यासाठी व आपल्यावर झालेल्या त्रासाबद्दल न्यायाची याचना केली आहे. सदरील निवेदन पुढील प्रमाणे
मी दिव्यांग आहे. 05/04/2021 पासून माझे संपुर्ण कुटुंब  कोविड -19 पोझिटीव्ह आसल्या कारणाने अहमदनगर मध्ये उपचार घेत असतांना आम्हाला गावातुन येण्या-जाण्या साठी पारंपारिक रस्त्याने ये-जाय करावी लागत होती. त्यामुळे बाबासाहेब खंडू मोहिते व सौ. कांताबाई बाबासाहेब मोहिते यांनी शेळके कुटुंबाला कोरोना झाला आहे या तिरस्काराने प्रशासनास व आम्हाला कोणती सुचना न देता रस्त पूर्णपणे बंद केला आहे.  हा रस्ता मोहिते यांच्या घरा जवळून जात आहे. त्या मुळे आम्हाला या रस्त्यावरुन ये -जाय करावी लागत होतीे. आम्हाला सुधा कोरोणा होईल याअविचारी भावनेने हा रस्ता पुर्णपणे मोहिते कुटुंबाने बंद केला आहे. माझी आई -नंदा केरु शेळके व भाऊ - बाबसाहेब केरु शेळके दिनांक 8/4/2021 रोजी अ‍ॅडमिट करुन 15/4/2021 रोजी डिस्चार्ज करुन घरी येत आसतांना रस्ता बंद आहे म्हणून विचारणा केली त्यावेळस मोहिते कुटुंबाने आईला सांगीतले की आमच्या घरा शेजारुन तुम्ही जाऊ नका तुमच्या वस्तीवर  करोना झाला आहे. त्या मुळे आम्हाला ही कोरोना होईल त्यामुळे तुमचा रस्ता बंद केला आहे. या मानसिक त्रासातुन आई 17/4/2021 रोजी पुन्हा अहमदनगर मध्ये अ‍ॅडमीट करावी लागली आणि या मानसीक त्रासात तिचे निधन झाले आहे. त्या मुळे प्रशासनाने या गोष्टीचा सहान भुती पुर्वक विचार करुन बाबासाहेब खंडू मोहिते व कांताबाई बाबासाहेब मोहिते यांच्यावर कायदेशिर कार्यवाही करावी.
हा रस्ता गांव नकाशा प्रमाणे दक्षिणे कडून उत्तरेकडे जाणारा आहे. हा रस्ता घोडेगांव -मिरी मेनरोडला जोडणारा आहे.  उत्तरेकडील लोहरवाडी व चांदा या गावांना जोडणारा रस्ता आहे. याच रोडने संपुर्ण उत्तरे कडील गावे व वस्त्या या रोडने दळण वळण करतात. रस्ता बंद केल्या मुळे उत्तरेकडील नागरीकांची आरोग्याची व शेती उदयोग धंद्याची दुग्ध व्यवसायकाची मोठी नुकसान होत आहे.
मी मोहिते कुटुंबाची विनंती केली की, मी अपंग आहे मला घरी पाई जातायेत नाही माझा रस्ता बंद करु नका तर त्यांनी माला सांगितले की तुला कुठे जायचे ते जाय या रस्त्याने जायचे नाही माझ्या व्यांगावर त्यांनी अपशब्द बोलून मला मानसिक त्रास दिला आहे. माझी गाडी रस्ता बंद केल्यामुळे घरापर्यंत जात नसल्या कारणाने मला गाडी गांवतच ठेवून घरी जातांना शाररीक त्रास सहन करावा लागत आहे. एकंदर या मोहिते कुटुंबाने दिव्यांग हक्काचा भंगकेला आहे. त्यामुळे दिव्यांग अधिनियम 2016 नुसार या कुटूंबावर कायदेशिर कार्यवाही करावी.
मी संरपच व ग्रामसेवक यांना फोन करुन व समक्ष भेटून हा प्रसंग सांगितला आहे. पंरतु संरपच कोविड पोझिटीव्ह असल्या कारणाने ते बाहेर येऊ शकत नाही व ग्रामसेवक ही नातेवाईक आजरी असल्याकारणाने ते देखील या समस्यकडे दुर्लक्ष करत आहे. हा रस्ता आम्हा कोरोनाची लागन झाल्या पासून म्हणजे दिनांक 6/04/2021 ते आजतागायत पुर्णपणे बंद आहे. माझी जमीन( गट. 399)व वस्ती  या उत्तर दिशेस असल्या कारणाने मला गावातुन येण्या-जाण्यासाठी दुसरा पर्याय नसल्या कारणाने माझ्या कुटुंबाला फार मोठ्या मानसिक व शारीरीक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. माझ्या वस्तीवर कोणी गंबीर आजारी पडले तर पेशंटला हॉस्पीटल मध्ये देखील घेऊन जाता येणार नाही आशी गंभीर परिस्थीती निर्माण झाली आहे.  जर माझ्या कुटुंब्याच्या जिवाला या मानसिकतेतून काही धोका निर्माण झालास या संपूर्ण घटनेला प्रशासन जबाबदार राहील.
नियमानूसार हा रस्ता  बंद करतांना त्यांनी प्रशासनास  सुचना देऊन बंद करावयास पाहीजे परंतू तसे न करता अविचारी  व गुंडगिरीचा दहशतीचा वापरकरुण हा रस्ता बंद केला आहे. आपण 10 ते 12 दिवसात हा रस्ता नियमाप्रमाणे खुला करुन मोहिते दाम्पत्या वर कायदेशीर कार्यवाही करावी. जर आपण कोणतीही कार्यवाही केली गेली नाहीतर मी दिनांक 07/06/2021 पासून आपल्याला कोणतीही पुर्व सुचना न देता आपल्या कार्यालया समोर अमरण उपोषणास बसेल यांची प्रशासनाने नोंद घ्यावी व पुढील अनुचित काही प्रकार झाल्यास प्रशासन जबाबदार राहील. कृपया करुन या तक्रार अर्जाचा सहानभुती पुर्वक विचार करुन हा रस्ता 10 ते 12 दिवसात पूर्णपणे खुला करावा व मोहिते दाम्पत्या वर नियमाप्रामणे कायदेशीर कार्यवाही करावी. ही नम्र विनंती.  असे निवेदनात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment