आयुक्त साहेब वॉक इन लसीकरण त्वरित सुरु करा
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नुकतेच मुंबई महानगरपालिकेने ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी जायचे आहे त्यांना वॉक इन लसीकरणची व्यवस्था करावी, असे आदेश केली आहे. त्याच धर्तीवर अहमदनगर येथे ही सुरु करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी मा. आयुक्त, अहमदनगर महानगरपालिका यांना केली आहे.
सध्या अहमदनगर शहरात असे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांना शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी परदेशात जायचे आहे परंतु प्रशासनाने वय वर्षे 21 ते 45 असलेल्या नागरिकांना लसीकरण बंद केले असल्यामुळे त्यांना लसीकरण उपलब्ध होत नाही व लसीकरण घेतल्या शिवाय सदर विद्यार्थी व नागरिक यांना परदेशात जाण्यासाठी परवानगी मिळत नाही ही अडचण निर्माण झाल्याने नुकतेच मुंबई महानगरपालिकेने ही परिस्थिती लक्षात घेऊन अशा विद्यार्थी व नागरिकांसाठी वॉक इन लसीकरणची व्यवस्था केली त्याच धर्तीवर ही व्यवस्था अहमदनगर येथे सुरु करावी व याचे आदेश त्वरित मा. आयुक्त यांनी सर्व लसीकरण केंद्राना देण्यात यावे जेणे करून विद्यार्थी व नागरिकांचे हाल होणार नाही. असे निवेदनाद्वारे मा. आयुक्त, मनपा, अहमदनगर व मा. आरोग्यधिकारी, मनपा अहमदनगर यांना मागणी केली आहे.
No comments:
Post a Comment