"या" ग्रामपंचायतीने केली दहा दुकानदारांवर कारवाई - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, May 7, 2021

"या" ग्रामपंचायतीने केली दहा दुकानदारांवर कारवाई

 "या" ग्रामपंचायतीने केली दहा दुकानदारांवर कारवाई


नगरी दवंडी / प्रतिनिधी 

अहमदनगर : नगर तालुक्यातील निंबळक येथील ग्रामपंचयतीने लॉक डाऊनचे नियम मोडणाऱ्या दहा दुकानदारावर कारवाई केली. लॉक डाऊन काळात कोरोना समितीने घालून दिलेले  नियम मोडणाऱ्या दुकानदारावर एक हजार रुपये दंड करून ही कार्यवाही करण्यात आली. नियम मोडणाऱ्या दुकानदारानी पुन्हा दुकान उघडले तर गुन्हे दाखल करणार असल्याचे सरपंच प्रियंका लामखडे यांनी सांगीतले.

गावातील कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी ग्रामपंचायतच्या कोरोना समितीने अकरा तारखेपर्यत लॉक डाऊन केला आहे. वैद्यकिय सेवा व दुध डेअरी वगळता सर्व आस्थापन बंद ठेवण्याचे आदेश असताना ही दुकानदार गुपचप दुकान चालू करून व्यवसाय करत असल्याचे निर्देशनास आल्यामुळे कोरोना समितीने एक हजार रुपयाचा दंड केला आहे. परत दुकान उघडे दिसले तर गुन्हे दाखल करण्याचा इशारा व्यवसाईकांना देण्यात आला. कोरोनाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी विलगीकरण व्हावे किंवा कोवीड सेंटरला जाऊन उपचार घ्यावे. लक्षणे असणारे रुग्ण गृहविलगीकरण करून राहत असतील तर त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल. कोरोना रुग्ण बाहेर फिरत असतील तर तात्काळ ग्रामपंचायत कोरोना समितीला कळवावे असे अवाहन समितीने केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here