"या " आरोग्य केंद्राला मिळाले सॅनीटायझर , मास्क , वाफेचे मशीन भेट - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, May 8, 2021

"या " आरोग्य केंद्राला मिळाले सॅनीटायझर , मास्क , वाफेचे मशीन भेट

 "या " आरोग्य केंद्राला मिळाले सॅनीटायझर , मास्क , वाफेचे मशीन भेट नगरी दवंडी / प्रतनिधी 

अहमदनगर : बाराबाभळी ( ता. नगर ) येथील आरोग्य केंद्र मध्ये सध्या लस व अँटीजेन तपासणी चालू आहे. तपासणीसाठी नागरीकांची मोठया प्रमाणात गर्दी होते.  या उपकेंद्रातील आरोग्य, कर्मचारी रुग्णाची सेवा अहोरात्र काम करत आहे.  मात्र सुरक्षतेच्या दुष्टीने येथे सॅनीटायझर, मास्क , हॅडग्लोजची कमतरता असल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरून काम करण्याची वेळ आली आहे. येथील समाज सेवक शंकर कवडे यांनी स्वखर्चातून सॅनीटायझर, मास्क,  हॅन्डग्लोज, वाफेचे मशीन भेट देऊन सामाजीक बांधीलकी जोपासण्याचे काम केले त्यांच्या या कामाचे नागरिकांनी स्वागत केले.  मागील महिन्यात  ३२ गरजूवंत कुंटुबाना किराणा वाटप केला. समाजातील दानशूर व्यक्तींनी गोरगरीब मजुराना हातभार लावावा असे अवाहन कवडे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment