संगणकशास्त्र विभागातील विद्यार्थ्याचे विविध राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनीमध्ये निवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, May 7, 2021

संगणकशास्त्र विभागातील विद्यार्थ्याचे विविध राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनीमध्ये निवड

 संगणकशास्त्र विभागातील विद्यार्थ्याचे विविध राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनीमध्ये निवड


नगरी दवंडी

नगर - कविड १९ मुळे निर्माण झालेल्या अत्यंत गंभीर परिस्थितीतही अहमदनगर जिल्हा प्रसारक समाजाच्या न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर मधील संगणकशास्त्र विभागातील काही विद्यार्थ्यांचे नुकतेच ऑनलाईन कॅम्पस मुलाखती मार्फत विविध राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनी मध्ये निवड झालेली आहे. एम.एस्सी. संगणकशास्त्र भाग २ या वर्गातील प्रणित पवार यांचे मेडली सॉफ्टवेअर सिस्टीम एल.एल.पी. पुणे व एम.एस्सी. संगणकशास्त्र भाग १ या वर्गातील आशिष भक्त याची निओसॉफ्ट, पुणे तसेच एम.एस्सी. संगणकशास्त्र भाग १ या वर्गातील चैताली झावरे व एम.एस्सी. संगणकशास्त्र भाग २ या वर्गातील प्रसन्ना धोंगडे यांचे आय.ब्रेन सॉफ्टवेअर, अहमदनगर येथे निवड झाली. सदर विद्यार्थ्यांच्या यशा बद्दल संस्थेचे अध्यक्ष  मा नंदकुमार झावरे पाटील, उपाध्यक्ष मा रामचंद्रजी दरे साहेब, सेक्रेटरी मा जी डी खानदेशे, सहसेक्रेटरी मा ऍड विश्वासराव आठरे पाटील, खजिनदार मा मुकेशदादा मुळे साहेब, सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी एच झावरे साहेब,  उपप्राचार्य व विभाग प्रमुख डॉ.ए.के.पंदरकर सर, यु. जी. समन्वयक प्रा.एम.बी.गोबरे, पी. जी. समन्वयक प्रा.एम.बी.भिंगारे,  कॅम्पस प्लेसमेंट समन्वयक डॉ.ए.ए.ताकटे व विभागातील सर्व प्राध्यापक यांनी सदर विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment