सोनई पोलिसांनी गावठी कट्यासह गुन्हेगारास पकडले. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, May 16, 2021

सोनई पोलिसांनी गावठी कट्यासह गुन्हेगारास पकडले.

 सोनई पोलिसांनी गावठी कट्यासह गुन्हेगारास पकडले.नगरी दवंडी

माका प्रतिनिधी_नेवासे तालुक्यातील सोनई पोलिस ठाण्याचे स.पो.नी.रामचंद्र कर्पे व त्यांच्या सहकारयांनी दी.15/5रोजी मनोज पाटील पोलिस अधीक्षक अहमद नगर,डाॅ.श्रीमती दिपाली काळे अप्पर पोलिस अधीक्षक श्रीरामपुर,उप विभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली,तालुक्यातील चांदा परीसरात, गुप्त बातमी दाराच्या माहितीवरुन,कुकाणा घोडेगाव पुलाजवळ गावठी कट्यासह एका आरोपीस ताब्यात घेतले.                                                                 याबाबत असे की,पोलिस ठाण्याचे कर्पे यांना बातमी दाराच्या माहितीनुसार या परिसरात अशोक उत्तम फुलमाळी नामक इसम गावठी कट्यासह फिरत असुन याबाबत विक्रीही करत असल्याची माहिती मिळताच त्यांनी आपल्या सहकार्यांसमवेत तातडीने चांदा या परिसरात जाळे लावले असता,रात्री दहा साडे दहाच्या  दरम्यान आरोपी फुलमाळीस रु.तिस हजार कि.दरम्यान गावठी कट्यासह दोन जिवंत काडतुसे तसेच रु चाळीस हजार रुपये अंदाजे किमतीची विनानंबर ची हिरो होंडा स्कूटरसह ताब्यात घेतले.आरोपी हा गुन्हेगारी प्रवृतीचा असुन त्याचेवरती याअगोदर सोनई पोलिस ठाण्यातच बरेचसे गुन्हे दाखल असल्याचेही रेकॉर्ड आहे.                         याप्रसंगी ठाण्याचे स.पो.नी.कर्पे यांच्यासमवेत या कौतुकास्पद कामगिरीत सहा.फौजदार संजय चव्हाण, पो.हे.काॅ.दत्तात्रय गावडे,पो.ना.शिवाजी माने,पो.काॅ. विठ्ठल थोरात,पो.काॅ.बाबा वाघमोडे,पो.काॅ.आदिनाथ मुळे,पो.काॅ.रवी गरजे,पो.काॅ.गोरख जावळे,चालक पो. हे.काॅ.मारुती पवार,आदी सहभागी होते.     

 .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here