आयुष्यात गमावलं पण कोरोनात कमावलं, फक्त माणुसकीच नातं - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, May 24, 2021

आयुष्यात गमावलं पण कोरोनात कमावलं, फक्त माणुसकीच नातं

 आयुष्यात गमावलं पण कोरोनात कमावलं, फक्त माणुसकीच नातं

नेवासा (ज्ञानेश सिन्नरकर) ः कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे माणसं होत्याचे नव्हते झालेत.पैसा असूनही जीव वाचवता येईना,शेवटी पैसा कामाला येत नसून माणसांच माणूसपणच कामाला येत असल्याचे कोरोना महामारीने दाखवू दिले .शेवटी प्रेम,जिव्हाळा अन् माणूसकीचाच धडा या कोरोना महामारीने दिल्यामुळे एकमेकांस ’सहाय्य करो’ची शिकवण कोरोना महामारीने करुन दिलेली असून जिवनात कस जगायच हा मंञ या कोरोनाने दिल्यामुळे आता माणसे गुण्या गोविंदाने नांदू लागल्याचे दिसून येवू लागले आहेत.
गडगंज पैसा,मोठ्या हॉस्पिटलात कोरोनाची लागण झालेले बडे रुग्ण उशाला पैसा ठेवून उपचार करुन घेत जगण्याच्या ‘आशेपोटी’ धडपड करत आहेत तर एकीकडे गोरगरीब रुग्ण सरकारी हॉस्पिटलात जगण्यासाठी धडपड करत आहेत. शेवटी नशिबाची ’दोरी’ परमेश्वराच्या हातात असल्याचे सिद्ध होत असल्यामुळे पैसा कामाला येत नाही तर केवळ प्रेमळ स्वभाव अन् माणूसकीच माणसाला ’तारु’ शकते असा विश्वासच कोरोना महामारीने जगाला दाखवून दिला आहे.कधीही कोणाला मदत न करणारे धनाढ्य मंडळीसुद्धा  आता हॉस्पिटलमध्ये जाऊन रुग्णांना मदतीचा आर्थिक  आधार देत आहेत. त्यामुळे भल्या - भल्यांचा पैशांचा ’गर्व’ हरण झाला असून शेवटी पैसा नाहीतर माणसाच माणूसपणच कामे येत असल्याची शिकवण कोरोना महामारीने दाखवून देवून जगण्यात नविन मंञ दिल्यामुळे कोरोना महामारीत प्रेम,जिव्हाळा वाढला असल्याचे सिद्ध झाले आहे. असे असले तरीही अनेक कोविड हॉस्पिटलमध्ये मात्र  डॉक्टरांकडून रुग्णांची लुटमार होताना दिसत आहे. त्यामुळे त्यांच्यातली माणुसकी कधी जागी होणार हासुद्धा एक मोठा प्रश्न अधोरेखित झाला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here