कोरोनावर सापडला रामबाण उपाय.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, May 22, 2021

कोरोनावर सापडला रामबाण उपाय..

 कोरोनावर सापडला रामबाण उपाय..

मोफत औषध घेण्यासाठी गर्दी.


हैदराबाद :
डोळ्यात औषध टाकल्यानंतर ऑक्सिजन पातळी वाढवणारे औषध नेल्लोर जिल्ह्यातील कृष्णपट्टणम (छशश्रश्रेीश वळीीींळलीं) येथील एका वैद्याने तयार केले असून ते घेण्यासाठी हजारो लोक रांगा लावत आहेत. त्यांचे नाव आनंदय्या असे आहे. विशेष म्हणजे ते औषध मोफत देत आहे. मुख्य म्हणजे त्यांच्या औषधाचा गुण येत असल्यामुळे अनेक नेते, अधिकारी त्याचा लाभ घेत असून आनंदय्या यांच्याविषयी कृतज्ञता प्रकट करीत आहेत. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या तडाख्यात सापडलेल्या रुग्णांची आर्थिक आणि शारीरिक परवड होत असताना ही घटना आंध्र प्रदेशच नव्हे तर देशात चर्चेचा विषय ठरली आहे. हे औषध घेण्यासाठी शेजारील राज्यांतील हजारो लोकही येऊ लागले आहेत.आमदार काकाणी गोवर्धन आणि माजी मंत्री चंद्रमोहन रेड्डी यांनी सांगितले की, रुग्णाची स्थिती कितीही गंभीर असली तरी दोन दिवसांत तो पॉझिटिव्हचा निगेटिव्ह होत आहे. छातीतील संसर्गाची तीव्रता 24.25 च्या घरातून शून्य होत आहे.

No comments:

Post a Comment