मोदी टीव्हीवर रडणार; खासदाराची भविष्यवाणी 100% टक्के खरी ठरली - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, May 22, 2021

मोदी टीव्हीवर रडणार; खासदाराची भविष्यवाणी 100% टक्के खरी ठरली

 मोदी टीव्हीवर रडणार; खासदाराची भविष्यवाणी 100% टक्के खरी ठरली


नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदींचा कंठ दाटून आला, ते भावुक झाले. यानंतर आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांनी त्यांनी केलेला भविष्यवाणी खरी ठरल्याचा दावा केला आहे. पंतप्रधान मोदी देशातील कोरोना परिस्थितीसंदर्भात बोलताना टीव्हीवर येऊन रडतील, असं सिंह यांनी गेल्याच महिन्यात म्हटलं होतं. आपल्या या भविष्यवाणीची आठवण सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून करून दिली. संजय यांनी 17 एप्रिलच्या एका मुलाखतीमध्ये व्यक्त केलेलं भाकित 21 मे रोजी खरं ठरलं, असं आपनं पत्रकात नमूद केलं आहे. 17 एप्रिल रोजी संजय यांनी एक मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी ’अजून थोडे दिवस वाट पाहा. ते (पंतप्रधान मोदी) तुमच्यासमोर येतील. ते फक्त त्यांच्या लाईट्स आणि कॅमेरासाठी वाट पाहत आहेत. ते टीव्हीवर रडतील आणि देशभरातील वृत्तवाहिन्या पंतप्रधान कशापद्धतीने भावुक झाले आणि रडू लागले याबद्दलच्या बातम्या दाखवतील,’ असं म्हटलं होतं.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here