राज्य परिवहन महामंडळ.. भाडेतत्त्वावर घेणार 500 बस. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, May 22, 2021

राज्य परिवहन महामंडळ.. भाडेतत्त्वावर घेणार 500 बस.

 राज्य परिवहन महामंडळ.. भाडेतत्त्वावर घेणार 500 बस.


मुंबई ः
राज्य परिवहन महामंडळाने नफा वाढविण्यासाठी 500 खासगी साध्या गाड्या भाडेतत्वावर घेण्याचे नियोजन सुरु केले आहे. याबाबत आगार प्रमुखांकडून माहिती मागवली जात असून, या महामंडळाच्या निर्णयाला एसटी कामगार संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. त्या गाड्या महामंडळाने आणल्यास एकाही भाडेतत्वावरील गाडी बसस्थानकात लागू देणार नाही, असा तीव्र विरोध एसटी कामगार संघटनांनी केला आहे.शिवशाही गाड्या महामंडळाने खासगी तत्त्वावर भाड्याने घेतल्या होत्या. त्याचे अपघात इतके झाले की त्याने महामंडळाची बदनामी झाली. तोच प्रकार पुन्हा महामंडळ करत आहे, असा आरोप कामगार संघटनांचा आहे. गेली 50 वर्षे महामंडळाची लाल गाडी विविध मार्गांवर धावत आहे, त्या जागी आम्ही खासगी गाडी येऊ देणार नाही. या निर्णयाविरोधात आम्ही महामंडळास पत्र पाठवले आहे, असे कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here