कर्जत तालुक्यात कोरोनाच्या आकडेवारी ची लपवाछपवी का? काँग्रेसचे सचिन घुलेचा प्रश्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, May 22, 2021

कर्जत तालुक्यात कोरोनाच्या आकडेवारी ची लपवाछपवी का? काँग्रेसचे सचिन घुलेचा प्रश्न

 कर्जत तालुक्यात कोरोनाच्या आकडेवारी ची लपवाछपवी का? काँग्रेसचे सचिन घुलेचा प्रश्न


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
कर्जत ः विविध सामाजिक संघटना पुढाकार घेऊन सध्या कोरोनाची चाचणी करण्यासाठी येत असताना या चाचण्या मधून आढळणारे कोरोना रुग्णाकडे प्रशासन लक्ष द्यायला तयार नसून त्या त्या गावाच्या कोरोना पॉझिटिव्ह आकडेवारी मध्ये ही समाविष्ट करायला तयार नसल्याचा गंभीर आरोप करतानाच या व्यक्तींच्या सम्पर्कातील लोकांची माहिती घेणे, तपासणी करणे आदी बाबी कडेही लक्षच दिले जात नसल्याच्या बाबीकडे युवक काँग्रेस चे कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष सचिन घुले यांनी लक्ष वेधले आहे.
कर्जत तालुक्यात कोरोणा काळात प्रशासन सुस्त झाले असून आपल्या जबाबदार्‍या विसरले आहे की काय असा प्रश्न उपस्थित करत राशीन मिरजगाव मध्ये काल व आज कोरोना च्या केलेल्या तपासन्यातील कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णाची आकडेवारी प्रशासनाने का जाहीर केली नाही असा प्रश्न युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घुले यांनी उपस्थित केला आहे.
दि 20 मे रोजी अभिनव युवा प्रतिष्ठाण व जनजागृती प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त विद्यमाने राशीन येथे मोफत कोरोना तपासनी शिबिर घेण्यात आले, या ठिकाणी 50 व्यक्तीची तपासणी करण्यात आली यातील 8 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या याची माहिती जनजागृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरदचंद्र आढाव यांनी राशीन प्राथमिक केंद्राचे डॉ व्हरकटे यांना दुपारी 3 चे सुमारास दिली, मात्र या आठ रुग्णाची माहिती दि 20 मे च्या शासकीय आकडेवारीमध्ये आलीच नाही, यानंतर दि 21 मे रोजी मिरजगाव येथेही अभिनव युवा प्रतिष्ठाण ने मोफत कोरोना तपासनी शिबिर घेतले यामध्येही आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले या ठिकाणी मिरजगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ गदादे हे उपस्थित होते, सदर मिरजगावची रुग्ण संख्या प्रशासनाने जाहीर केली त्यामध्ये मिरजगाव मध्ये एकही रुग्ण नसल्याचे जाहीर केले केले आहे. प्रशासन कोरोनाची खरी आकडेवारी का लपवत आहे, कोरोना कमी झाला हे दाखविण्यासाठी प्रशासन अशा पद्धतीने नागरिकांच्या जीवाशी खेळत असेल तर ते निषेधार्य असून प्रशासन अत्यंत कमी चांगले काम करत आहे असे लोकांना भासवून आपल्या जबाबदारी पासून दूर पळत आहे. कर्जत तालुक्यात अधिकार्याचा वचक राहिलेला नाही, एकीकडे लसीकरणा चा गोंधळ सुरू असताना आता कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णाची आकडेवारीच प्रशासन कमी दाखवत असल्याचे समोर येत असून याबाबत राशीन मिरजगाव येथील सरकारी डॉक्तराना माहिती देऊन ही त्याचा उपयोग होत नसेल तर हे प्रशासन कोणते काम करते आहे याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी घुले यांनी केली आहे. याबाबत तहसीलदार आगळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदीप पुंड यांचे शी आपण स्वतः बोललो मात्र या दोघांनीही आपल्याला ही माहिती नसल्याचे म्हणत या अत्यंत गंभीर परिस्थितित ही तालुक्यावर आपले वर्चस्व नसल्याचेच दाखवून दिले असून अधिकार्‍यानी या काळात तरी चमकोगिरी करण्या ऐवजी प्रशासनामध्ये सुसूत्रता कशी आणता येईल याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे घुले यांनी म्हटले आहे.
सामाजिक संघटना पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करून प्रशासनाला मदत होईल असे काम करत असताना त्यांना मदत करण्या एवजी त्यांनी तपासलेल्या रुग्णाकडे पहायचेच नाही असे धोरण घेतले आहे काय? राशीन व मिरजगाव येथे या खाजगी शिबिरात कोरोना पोजिटिव्ह सापडलेल्या रुग्णाचे काय झाले ते कोठे आहेत त्याच्या संपर्कातील  कोण आहेत त्याच्या तपासण्या करणे आदी करणे आवश्यक असताना प्रशासन नेमके काय दुर्लक्ष करते आहे असा गंभीर प्रश्न घुले यांनी उपस्थित केला आहे. याबाबीकडे आपण महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे लक्ष वेधणार असल्याचेही त्यांनी पत्रकारांना सांगितले.

No comments:

Post a Comment