‘फिरत्या’साठी आजपासून अ‍ॅण्टीजेन टेस्ट. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 17, 2021

‘फिरत्या’साठी आजपासून अ‍ॅण्टीजेन टेस्ट.

 ‘फिरत्या’साठी आजपासून अ‍ॅण्टीजेन टेस्ट. 

‘कोरोना’ रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध पातळ्यांवर भरीव प्रयत्न करीत आहे. रस्त्यावर विनाकारण फिरणार्‍या नागरिकांसाठी अ‍ॅण्टीजेन टेस्ट करण्याचा आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी काल जारी केला नगर मनपा दक्षता पथकाने ही या फिरत्या कडून आतापर्यंत 5 लाख 30 हजार 200 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली विनाकारण संचार करणार्‍या नागरिकांची आता अँटिजन टेस्ट करण्यात येणार आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी रविवारी संध्याकाळी दिले. अत्यावशक्य सेवेच्या नावाखाली विनाकारण फिरणार्‍या नागरिकांची जिल्ह्यात संख्या वाढली आहे, असे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसते. कोरोना चाचणी करणार्‍या पथकासोबत एक पोलीस पथकही असणार आहे. पोलीस पथकासोबत वेळेत चाचणी करणारे मनुष्यबळ आणि आवश्यक साधन सामग्री देण्याचे आदेशही जिल्हाधिकारी यांनी आरोग्य विभागाला व पोलीस प्रशासनाला दिले आहेत.
सोमवारपासून नगर शहरातील चार ठिकाणी व जिल्ह्यतील प्रमुख शहरात रस्त्यावर विनाकारण फिरणार्‍या नागरिकांची करोना चाचणी वैद्यकीय पथकामार्फत केली जाणार आहे. या चाचणीत सकारात्मक अहवाल आलेल्यांची थेट सेंटरमध्ये रवानगी केली जाणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी हा निर्णय जाहीर केला. नगर शहरातील र्निबध मनपा आयुक्तांनी काही प्रमाणात शिथिल करताच शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठी गर्दी उसळली. या गर्दीमुळे रुग्णवाढीचा पुन्हा धोका निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातील रुग्णसंख्या फारशी घट होताना दिसत नाही. मनपा आयुक्तांनी आज सुधारित आदेशानुसार फेरर्निबध जारी केले आहेत. कोरोनेला प्रतिबंध करण्यासाठी व विनाकारण संचार करणार्‍या नागरिकांची चाचणी करण्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दोन चेक पॉइंट उभारण्यात येणार आहेत. हे चेक पॉइंट गर्दीच्या ठिकाणी असणार आहेत. गर्दीच्या ठिकाणी विनाकारण आढळून आलेल्या नागरिकांची कोरोना चाचणी करून त्याचा अहवालही आरोग्य यंत्रणा पोर्टलवर अपलोड करणार आहे. त्यामुळे किती नागरिक विनाकारण फिरत आहेत, याची माहिती प्रशासनाला होणार आहे. या आदेशाची अंमलबजावणी आज सकाळपासून जिल्ह्यात सुरू झाली आहे.

No comments:

Post a Comment