‘स्वास्थ्य’ कडुन जिल्ह्याला 30 ऑक्सिजन कॉन्संटेटर. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 25, 2021

‘स्वास्थ्य’ कडुन जिल्ह्याला 30 ऑक्सिजन कॉन्संटेटर.

 ‘स्वास्थ्य’ कडुन जिल्ह्याला 30 ऑक्सिजन कॉन्संटेटर.

अहमदनगर : जिल्ह्यातील कोरोनाच्या बिकट परिस्थितीत ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची कमतरता आहे. या पार्श्वभूमीवर पद्मश्री पोपटराव पवार यांच्याकडून देशातील विविध सामाजिक संस्थांना मदतीसाठी आवाहन करण्यात आले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत आरोग्य सेवेत उत्तम काम करणार्‍या स्वास्थ्य या संस्थेने नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे 30 ऑक्सिजन कॉन्संटेटर उपलब्ध करून दिले. प्रत्येक कॉन्संट्रेटर लाख रुपये किमतीचा असून, 30 युनिटची किंमत 30 लाख रुपये आहे. त्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचणार आहेत. प्रशासनाला संकटाच्या काळात केलेल्या सहकार्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी पवार यांचे आभार मानले आहेत. यासाठी डॉ. आनंद अभय बंग यांनी सहकार्य केल्याबद्दल पद्मश्री पवार यांनी त्यांचे आभार मानले. अहमदनगर जिल्ह्यासाठी आणखी व्हेंटिलेटर मिळण्यासाठी विविध संस्थांकडे प्रयत्न सुरू आहेत, असे पद्मश्री पोपटराव पवार यांनी सांगतिले.

No comments:

Post a Comment