शहराच्या स्थापना दिनानिमित्त 28 रोजी फ्रान्समधील डॉ. शशी धर्माधिकारींशी ऑनलाईन संवाद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, May 27, 2021

शहराच्या स्थापना दिनानिमित्त 28 रोजी फ्रान्समधील डॉ. शशी धर्माधिकारींशी ऑनलाईन संवाद

 शहराच्या स्थापना दिनानिमित्त 28 रोजी फ्रान्समधील डॉ. शशी धर्माधिकारींशी ऑनलाईन संवाद

रोटरी सेंट्रल व इनरव्हील क्लबचा विशेष कार्यक्रम


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल आणि इनर व्हील क्लब ऑफ अहमदनगर व्हीनस यांच्या वतीने अहमदनगर शहराच्या स्थापना दिनानिमित्त दि. 28 मे 2021रोजी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात इतिहास अभ्यासक तथा ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख हे फ्रान्सस्थित  मूळचे अहमदनगरचे असणारे डॉक्टर शशी धर्माधिकारी यांच्याशी ऑनलाईन संवाद साधून नगरचा ऐतिहासिक मागोवा घेणार आहेत. प्रा. प्रसाद बेडेकर समन्वयक असतील. नगर शहराचा वैभवशाली इतिहास नव्या पिढीसमोर मांडण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे. डॉ शशी धर्माधिकारी यांनी अहमदनगर येथील शाळा व कॉलेजमध्ये सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केले आणि नंतर मुंबईला इ.डल. (ढशलह) व इंग्लंड केमिकल इंजिनिअरिंग मध्ये पीएचडी पूर्ण केले. सध्या ते महाराष्ट्र मंडळ फ्रान्सचे अध्यक्ष आहेत. नगरचा इतिहास हा डॉक्टर धर्माधिकारी यांच्या जिव्हाळ्याचा विषय.
सुलताना चांदबिबी वर त्यांनी अनेक वर्षे अभ्यास करून एक उत्तम पुस्तक लिहिले आहे. तसेच ’असे होते अहमदनगर’ या पुस्तकाद्वारे नगर शहराच्या अनेक आठवणींना त्यांनी शब्दरूप दिले. त्यांच्या याच अभ्यासातून नगरकरांना अहमदनगर शहराचा इतिहास कळावा यासाठी प्रसन्न खाजगीवाले व योगिता मुथा यांच्या संकल्पनेतून हा अनोखा उपक्रम होत आहे.
 तरी सर्वांना विनंती आहे नगर स्थापना दिवस साजरा करण्यासाठी सर्वांनी शुक्रवार दिनांक 28 मे 2021 रोजी सायंकाळी 5 वाजता खालील दिलेल्या लिंक वर ती जॉईन व्हावे. सर्व नगरकरांनी विशेषतः शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, इतिहास प्रेमी यांनी या कार्यक्रमाचा आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष प्रसन्न खाजगीवाले, सेक्रेटरी ईश्वर बोरा,  इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा योगिता मुथा, प्रेसिडेंट इलेक्ट प्रगती गांधी, सोनल फिरोदिया यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क - 9823799998

No comments:

Post a Comment