खा. संभाजी राजे यांची शरद पवारांना विनंती. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, May 27, 2021

खा. संभाजी राजे यांची शरद पवारांना विनंती.

 मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना एकत्र आणा

खा. संभाजी राजे यांची शरद पवारांना विनंती.


मुंबई -
मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे, अशा महत्त्वाच्या नेत्यांना एकत्र आणण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना छत्रपती संभाजीराजे यांनी केली. संभाजीराजे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. संभाजीराजे हे मराठा आरक्षणासाठी नेहमीच आघाडीवर राहिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज त्यांनी थेट शरद पवारांशी चर्चा केली. मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांसोबत सकारात्मक चर्चा झाली आहे असे संभाजीराजे म्हणाले. मराठा समाज किती अस्वस्थ आहे, किती दु:खी आहे. तसंच मराठा समाजाच्या परिस्थितीची कल्पना शरद पवारांना दिली. तुम्ही पुढाकार घ्यावा अशी मी विनंती केली असून मुख्यमंत्री, विरोधी पक्ष, नारायण राणे यांना एकत्र आणलं पाहिजे असा आग्रह केला, अशी माहिती संभाजीराजे यांनी दिली. मराठा समाजाला न्याय दिला पाहिजे असं मी शरद पवारांना सांगितलं असून त्यांनी सकारात्मकता दाखवली आहे. उद्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. त्यानंतर उद्या संध्याकाळी मुंबईत पत्रकार परिषद होईल, असं संभाजीराजेंनी सांगितलं.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here