कोरोनाकाळात कृतिशील शिक्षकांनी जपली सामाजिक बांधिलकी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, May 27, 2021

कोरोनाकाळात कृतिशील शिक्षकांनी जपली सामाजिक बांधिलकी

 कोरोनाकाळात कृतिशील शिक्षकांनी जपली सामाजिक बांधिलकी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः  कोरोनाकाळात कृतिशील शिक्षक महाराष्ट्र अर्थात शिक्षकांचे  ए .टी.एम .परिवार यांनी कोव्हीड सेंटरला मोठी अर्थिक मदत करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
मागील दीड वर्षात अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड व परिसरातील सुमारे सहा हजारांवर कोरोनाबाधित रुग्णांवर मोफत उपचार करणारे जामखेड येथील डॉ.आरोळे कोव्हीड सेंटरला कृतिशील शिक्षक सामाजिक प्रतिष्ठान (अलींर्ळींश ढशरलहशी डरारक्षळज्ञ झीरींळीहींहरप) संचलित ए.टी.एम.परिवारातील शिक्षकांच्या वतीने एकावन्न हजार रुपयांची नुकतीच मदत केली आहे.आशिया खंडाचा नोबेल समजला जाणारा प्रतिष्ठेचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त समाजसेवक डॉ.रजनीकांत आरोळे व डॉ.मेबल आरोळे या आरोग्यसेवेला जीवन समर्पित केलेल्या मातापित्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे सुपुत्र डॉ.रवींद्र आरोळे व कन्या डॉ.शोभा आरोळे यांचा कोरोनामुक्तीचा आरोळे पॅटर्न सध्या प्रेरणादायी ठरत आहे.कोरोनाकाळातील या मोठ्या संकटात रुग्णांना मोफत उपचार करून महान सामाजिक कार्य करणार्‍या  जामखेड येथील डॉक्टर आरोळे आरोग्यमंदिरास ए .टी.एम. परिवाराच्या वतीने कृतिशील शिक्षक महाराष्ट्र चे संयोजक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विक्रम अडसूळ ,ज्योती  बेलवले ,नारायण मंगलारम ,तुकाराम अडसूळ ,ज्ञानदेव नवसरे ,उमेश कोटलवार ,लक्ष्मीकांत इडलवार ,लहू बोराटे ,मनोहर इनामदार ,किसन वराट ,यांच्यासह इतर शिक्षकांनी  ही अर्थिक मदत केली आहे.या एकावन्न हजर रुपये मदतीचा धनादेश नुकताच जामखेड येथील डॉ.आरोळे कोव्हीड सेंटरला देण्यात आला आहे.ए .टी.एम.हा महाराष्ट्रातील शिक्षकांचा समूह (प्रतिष्ठान) आहे.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण संमेलन ,शिक्षक साहित्य संमेलन ,ऑनलाइन संवाद व मुलाखती ,शिक्षकांचे पुस्तके प्रकाशन  असे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम या समूहाच्या वतीने राबविले जातात.हे प्रतिष्ठान / समूह  शैक्षणिक कार्याबरोबर सामाजिक कार्यातही आघाडीवर असते. मागील वर्षी लॉकडाऊन काळात कर्जत तालुक्यातील अनेक गोरगरीब कुटुंबांना किराणा वाटप करण्यात आला होता. या सामाजिक कार्याबद्दल  सर्व कृतिशील शिक्षकांचे  जामखेडच्या डॉ. आरोळे हॉस्पिटल /कोव्हीड सेंटरचे डॉ. रवींद्र आरोळे आणि समाजातील विविध घटकांनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment