एमआयडीसीतील ठेकेदारांच्या मुजोरपणाला आळा घालू : संतोष लांडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, April 12, 2021

एमआयडीसीतील ठेकेदारांच्या मुजोरपणाला आळा घालू : संतोष लांडे

 एमआयडीसीतील ठेकेदारांच्या मुजोरपणाला आळा घालू : संतोष लांडे

कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः देशाच्या आर्थिक जडण-घडणीमध्ये औद्योगिक क्षेत्राचा मोठा वाटा आहे. या भरभराटीमध्ये कामगार हा या क्षेत्राचा कणा आहे. नगर एमआयडीसीमध्ये कंत्राटी ठेकेदारांकडून कामगारांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत असून आर्थिक लूटही होत आहे. कामगारांना कामगार कायद्याप्रमाणे त्यांचा हक्क मिळवून देणे गरजेचे आहे. काही कंपनीतील ठेकेदारांच्या मुजोरपणामुळे कामगारांचे वेतन वेळेवर दिले जात नाही. तसेच कामगारांना पूर्वसुचना न देता कामावरून काढले जात असल्यामुळे कामगारांवर या कोरोनाच्या काळामध्ये आर्थिक परिस्थितीला तोंड द्यावे लागते तसेच कुटुंबावर उपासमारीची वेळ येत आहे. दि. 6 एप्रिल रोजी क्लासिक व्हिल कंपनीतील 30 कंत्राटी कामगारांचे दीड महिन्याचे पगार ठेकेदार गोवर्धन सूर्यवंशी यांनी थकवले असून कामगारांनी पगाराची मागणी केली असता कामगार संदीप रणनवरे यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. सदर घटनेचा तपशील एसपी ऑफिस येथे अर्जाद्वारे देण्यात आला तो अर्ज मागे घेण्यासाठी ठेकेदार संदीप
साळवे याने कामगार सुरज शेळके याला घरी जात असताना रस्त्यात अडवून शिवीगाळ करुन व मारुन टाकण्याची धमकी दिली. सदर घटना जिल्हा पोलिसप्रमुख मनोज पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी लगेच एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर लगेच 341, 504, 506 या कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. कामगारांच्या हक्कासाठी आम्ही अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेच्या माध्यमातून लढा उभारुन कोणत्याही कामगारावर अन्याय होऊन दिला जाणार नाही. उद्योजक व कामगार एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत. दोघांच्या सहकार्यातून एमआयडीसीतील उद्योजकाला भरारी द्यायची आहे. मूठभर लोकांच्या चुकीच्या धोरणामुळे कामगार व उद्योजकांमध्ये संघर्ष निर्माण होऊन एमआयडीसीची बदनामी होत आहे. हा प्रकार थांबविण्यासाठी सर्वांनी सहकार्याची भूमिका घेणे गरजेचे आहे, असे मत अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष लांडे यांनी केले.

No comments:

Post a Comment