भिंगार बँकेत महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, April 12, 2021

भिंगार बँकेत महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

 भिंगार बँकेत महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन


अहमदनगर ः
महात्मा ज्योतिबा फुले यांनी राजकीय स्वातंत्र्यते बरोबर सामाजिक सुधारणा समाजात घडवून आणू ही भुमिका घेतली आणि त्यामळेच अनेक अनिष्ठ चाली, रुढी, परंपरा नष्ट होण्यास मोलाची मदत झाले हे त्यांचे फार मोठे कार्य मानले पाहिजे. गुलामगिरी, शेतकर्यांचा आसुड असा विविध साहित्यातून सामाजिक सुधारणेचा विषय सर्व स्तरापर्यंत पोहचविला. त्यामुळे समाज परिवर्तन होऊन समाजोन्नत्तीचे काम झाले. आपण सर्व एक आहोत, त्यामुळे भेदभाव न करतांना सर्वांना बरोबर घेऊन चालले पाहिजे, ही शिकवण त्यांनी आपल्या कृतीतून दिली. अशा थोर समाज सुधारकामुळेच समाजात जागरुकता निर्माण होऊन स्वातंत्र्याची पहाट झाली, असे प्रतिपादन भिंगार बँकेचे चेअरमन अनिलराव झोडगे यांनी केले.
भिंगार अर्बन बँकेच्यावतीने महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त बँकेच्या आवारातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन बँकेचे अध्यक्ष अनिलराव झोडगे यांनी अभिवादन केले. याप्रसंगी ज्येष्ठ संचालक नाथाजी राऊत, नामदेवराव लंगोटे, एकनाथराव जाधव, महेश झोडगे,  शाम जाधव, अमित झोडगे, सतिष पिंपळे, विजय धाडगे आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment