थोर समाजसुधारक म्हणून महात्मा फुले नेहमीच अग्रस्थानी - भगवान फुलसौंदर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, April 12, 2021

थोर समाजसुधारक म्हणून महात्मा फुले नेहमीच अग्रस्थानी - भगवान फुलसौंदर

 थोर समाजसुधारक म्हणून महात्मा फुले नेहमीच अग्रस्थानी - भगवान फुलसौंदर

शिवसेनेच्यावतीने महात्मा फुले यांना अभिवादन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः दीडशे वर्षापूर्वी भारतात ज्यांनी अनेक समाज सुधारणा सुरु केल्या त्यामुळेच आज समाजिक समता आपणास दिसून येत आहे. या समाजसुधारणेच्या  महान कार्याची सुरुवात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली. त्याकाळच्या भारतीय  समाज रचनेत  अनिष्ठ रुढी विरुद्ध संघर्ष करीत समाज परिवर्तनाची बीजे रोवणार्या थोर समाजसुधारक म्हणून महात्मा फुले यांचे नाव अग्रभागी आहे. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणार्या आणि कोट्यावधीा जनतेचे आयुष्य उजळून टाकणार्या या थोर समाजसुधारकास आणि तितक्याच निर्धाराने त्यांच्या कार्यात सक्रिय सहभाग देणार्या क्रांती ज्योती सवित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळावा, यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी केले.
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्यावतीने माळीवाडा येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक दत्ता कावरे, माळीवाडा देवस्थानचे उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, संजय हजारे, गणेश कोल्हे, सुरेश इवळे, नाना आरे, संजय करपे आदि उपस्थित होते. याप्रसंगी संभाजी कदम म्हणाले, थोर समाजसुधारक असलेल्या महात्मा फुले यांनी त्यावेळच्या समाज व्यवस्थेाविरुद्ध बंड करुन सर्वसामान्यांच्या जीवन प्रकाशमान करण्याचे काम केले आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन अनेक समाजसुधारक घडले आणि आजही घडत आहे. वंचित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम त्यांनी केले. आपणही त्याच कामास प्राधान्य देऊन त्यांचे कार्य पुढे सुरु ठेवले पाहिजे हाच त्यांच्या कार्याचा गौरव होईल. याप्रसंगी दत्ता कावरे, पंडितराव खरपुडे आदिंनी मनोगत व्यक्त केली. सध्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर संचार बंदी असल्याने मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत जयंती उत्सव शासनाच्या नियमांच्या आधिन राहून साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

No comments:

Post a Comment