नेवाशात लॉकडाऊनमध्ये दारूचा काळाबाजार पुन्हा सुरू - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, April 8, 2021

नेवाशात लॉकडाऊनमध्ये दारूचा काळाबाजार पुन्हा सुरू

नेवाशात लॉकडाऊनमध्ये दारूचा काळाबाजार पुन्हा सुरू

नेवासा शहर परिसर व फाटा परिसरात मोठ्या प्रमाणात परमिट रूम धारक आहे दिवस मावळतीला येताच बर्‍याच ठिकाणी दारूची चढ्या भावाने विक्री सुरू झाल्याचे दिसून येत आहे.


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः कोरोना संकटात दुसर्‍यांदा लॉकडाउन’ करताना दारू दुकानांतील साठ्याच्या नोंदींची पडताळणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी केली नाही. त्यामुळे दारूच्या काळ्या बाजारास वाव मिळताना दिसत आहे.
राज्य शासनाने पाच एप्रिलपासून कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला. औषधे, किराणा दुकान, भाजीपाला, फळविक्रेते, बेकरी, दूध व दुधाचे उपपदार्थ विक्रेते यांना वगळण्यात आले आहे. दारूविक्रीची दुकाने बंद करण्यात आली आहेत.
याच संधीचा गैरफायदा घेऊन अनेकांनी एक दिवस आधीच दारूची खरेदी काळ्या बाजारात जादा दराने करून ठेवली आहे. अनेक दारू विक्रेत्यांनी दुकानातील दारूसाठ्याचा क्लोजिंग रिपोर्ट मनमानी पद्धतीने लिहिला आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात दारूचा काळा बाजार करण्यास मोकळीक मिळाली आहे.
दारू पिणार्‍यांवर कोणतेही नियंत्रण राहणार नाही. जादा दारू पिण्यात आल्याने गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. दारूउत्पादक काही कंपन्या शासनाचा कर चुकवून दुकानदारांना जादा दारू देत आहेत. या सर्व प्रकरणातून गैरप्रकार वाढीस लागण्यास पाठबळ मिळत आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने हेतुपुरस्सर याकडे दुर्लक्ष केले आहे. या प्रकरणाची चौकशी करणे गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here