नेवाशातील मिनी लॉकडाऊन, तिसरा दिवस दुकाने बंद मात्र गर्दी कायम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, April 8, 2021

नेवाशातील मिनी लॉकडाऊन, तिसरा दिवस दुकाने बंद मात्र गर्दी कायम

 नेवाशातील मिनी लॉकडाऊन, तिसरा दिवस दुकाने बंद मात्र गर्दी कायम

मोकाट फिरणार्‍या नागरिकांवर प्रशासन कधी कारवाई करणार?


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः जिल्हाधिकारी  डॉ .राजेंद्र भोसले  यांनी तीन दिवसांपूर्वी  अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश पारित केले  आणि लागलीच दुकानं बंद झाली  परंतु नागरिक मात्र रस्त्यावर मोकाट फिरताना मोठ्या प्रमाणात दिसतात  कोरोना या आजाराची साखळी मोडण्यासाठी ठाकरे सरकार वेगवेगळ्या उपाययोजना करत असताना  नागरिक मात्र कोणत्याही प्रकारे गांभिर्याने वागताना दिसत नाहीत.भाजीपाला मार्केट ,किराणा दुकाने तसेच इतर ठिकाणी बर्‍याच मोठ्या प्रमाणात गर्दी पाहावयास मिळत आहे. अशावेळी या मोकाट फिरणार्या नागरिकांना  प्रशासन आता कधी आवर घालणार  यावरच कोरोणाचे पुढचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.दररोज  वाढणारा आकडा हा नेवासा तालुक्यातील  चिंतेचा विषय बनला आहे। त्यामुळे सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून आपापल्या घरीच बसावे  आणि मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा अशा प्रतिक्रिया आता जनतेमधून मिळत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here