प्रहार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी सुरेश सुपेकर यांची निवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, April 8, 2021

प्रहार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी सुरेश सुपेकर यांची निवड

 प्रहार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी सुरेश सुपेकर यांची निवड


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुका प्रहार संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी अटीतटीच्या लढतीत शहरातील उद्योजक सुरेश सूपेकर यांची निवड झाल्याने तालुकाध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेले लोणी व्यंकनाथ येथील राजेंद्र काकडे यांना माघार घ्यावी लागली.
या बाबत सविस्तर असे की अहमदनगर येथे झालेल्या प्रहार संघटनेच्या श्रीगोंदा तालुकाध्यक्ष कृष्णा खामकर यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने रिक्त झालेल्या पदासाठी प्रदेश संघटक संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत तालुकाध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेले शहरातील उद्योजक सुरेश सुपेकर आणि लोणी व्यंकनाथ येथील राजेंद्र काकडे यांच्यात झालेल्या निवडीत सुरेश सुपेकर यांची बहुमतांनी निवड करण्यात आली.
सुरेश सुपेकर यांचे संघटन कौशल्य व सामजिक कामाची दखल घेत निवड केल्याचे यावेळी प्रदेश संघटक संतोष पवार यांनी सांगितले.
निवड झाल्यानंतर सुपेकर यांनी सांगितले की आगामी काळात तालुक्यात  मोर्चे बांधणी करत प्रहार संघटनेच्या गाव तेथे शाखा तयार करून संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार  आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी, जिल्हा सचिव प्रकाश बेरड, जिल्हा उपाध्यक्ष वामनभाउ भदे, पप्पु येवले, माजी तालुकाध्यक्ष कृष्णा खामकर, शहराध्यक्ष माधव बनसोडे, साहेबराव रासकर, कांतिलाल कोकाटे, भूषण साळवे, योगेश खलाटे, राजेन्द्र काकडे, जिल्हा सल्लगार मालोजी शिकारे, यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment