वडारवाडी, केकती-शहापूर व बाराबाबळीत बांधकाम व्यावसायिकांनी अनाधिकृतपणे इमारती उभ्या केल्याचा आरोप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, April 8, 2021

वडारवाडी, केकती-शहापूर व बाराबाबळीत बांधकाम व्यावसायिकांनी अनाधिकृतपणे इमारती उभ्या केल्याचा आरोप

 वडारवाडी, केकती-शहापूर व बाराबाबळीत बांधकाम व्यावसायिकांनी अनाधिकृतपणे इमारती उभ्या केल्याचा आरोप

कायदेशीर कारवाई करण्याची मागणी, पोलीस अधिक्षक कार्यालयात निवेदन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः भिंगार शहराजवळ असलेल्या वडारवाडी, केकती-शहापूर व बाराबाबळी (ता. नगर) या ग्रामपंचायत हद्दीत बनावट कागदपत्रे तयार करुन ग्रामपंचायतची परवानगी न घेता अनाधिकृतपणे मोठ्या प्रमाणात पक्के बांधकाम करणार्या बांधकाम व्यावसायिक व त्यांना सहकार्य करणार्या ग्रामपंचायत अधिकार्यांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन   सामाजिक कार्यकर्ते पवन भिंगारदिवे यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात दिले. यावेळी आरपीआयचे शहराध्यक्ष सुशांत म्हस्के, संतोष पाडळे उपस्थित होते.    
नगर तालुक्यातील वडारवाडी, केकती-शहापूर व बाराबाबळी येथे बांधकाम व्यवसायिकांनी ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक व इतर अधिकार्‍यांना हाताशी धरुन बांधकाम परवाना न घेता तसेच शासनाचा कर बुडवून अनाधिकृतपणे रो हाऊसिंग, ट्विन बंगलो, अपार्टमेंट व गाळ्यांचे बांधकाम केले आहे. सदर घर, फ्लॅट व गाळे बांधकाम व्यावसायिक बनावट कागदपत्राच्या आधारे विक्री करीत असल्याचा आरोप पवन भिंगारदिवे यांनी केला आहे. ग्रामपंचायत अधिनियम 2005 पासून ग्रामपंचायतला बांधकाम परवाना देण्याचा कुठलाही अधिकार नसताना, या बांधकाम व्यावसायिकांनी ग्रामपंचायतीचे बनावट बांधकाम परवाना तयार करून शासनाची व सर्वसामान्यांची फसवणूक केलेली आहे. तरी अशा प्रकारणीची सखोल चौकशी करुन यामध्ये दोषी आढळणारे बांधकाम व्यावसायिक व ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment