मासिक पाळी समस्यांवर निसंकोच बोला या विषयावर ऑनलाईन कार्यशाळा संपन्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, April 10, 2021

मासिक पाळी समस्यांवर निसंकोच बोला या विषयावर ऑनलाईन कार्यशाळा संपन्न

 मासिक पाळी समस्यांवर निसंकोच बोला या विषयावर ऑनलाईन कार्यशाळा संपन्न

रोटरी एक्शन ग्रुप व रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शिनी तर्फे

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः आजच्या काळातही मासिक पाळीतील समस्यांवर बोलताना मुलींना, महिलांना संकोच वाटतो व अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच आजच्या काळामध्ये सर्व महिला सॅनिटरी नॅपकिन्स वापरतात पण याचा पर्यावरणाला, निसर्गाला धोका होऊ शकतो याची जाणीव त्यांना नाही. या  व अशा विविध विषयी जागृती निर्माण व्हावी यासाठी रोटरी एक्शन ग्रुप व रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शिनी  तर्फे मासिक पाळी समस्यांवर निसंकोच बोला या विषयावर आँन लाईन कार्यशाळा घेण्यात आली.
नागपूर, मद्रास, बेंगलोर मधील डॉक्टर आणि पर्यावरण वादी महिलांकडून या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले.यामध्ये शंभर मुलींनी सहभाग नोंदविला यामध्ये नगर मधील विविध शाळा, नगरमधील विविध रोटरी इंटरँक्ट क्लब  व गव्हर्नमेंट  पॉलीटेक्निकल  कॉलेज मधील विद्यार्थीनीनी आपला सहभाग नोंदवला.एजी र्रो.विद्या श्रीनिवासन (मद्रास), रो.डॉ.शांताला भोळे( नागपूर), पर्यावरण तज्ञ रो.स्मिता कुलकर्णी (बंगलोर), विशेष निमंत्रित रोटरी क्लबचे डिस्टिक गव्हर्नर हरीश मोटवानी यांची कन्या किरण मोटवानी, रोटरी प्रियदर्शिनी अध्यक्षा रो.गीता गिल्डा, सचिव रो.देविका रेळे, रो.डॉ.बिंदू शिरसाठ आदीनी या कार्यशाळेत सहभाग घेऊन मार्गदर्शन केले.
मासिक पाळीचे आधुनिक पद्धतीने व्यवस्थापन व नियोजन करून महिलांनी याविषयी मनमोकळे पणे बोलले पाहिजे. एकमेकींचे अनुभव सांगून येत्या काळत योग्य नियोजन करून या समस्येवर उपाय केलाच पाहिजे याविषयी तसेच वॉशेबल सॅनेटरी नॅपकिन तसेच सिलिकॉन कप व पर्यावरणाला धोका टाळण्यासाठी पर्याय आणि त्याची माहिती या तज्ञ मंडळींनी मुलींना दिली अशी माहिती इंटरँक्ट  क्लबच्या डॉ.बिंदू शिरसाठ यांनी दिली. कार्यशाळेत मुलींनी सुद्धा अनेक प्रश्न आणि त्यांच्या समस्या मांडल्या. त्यांना योग्य प्रकारे याप्रश्नी आवश्यक अशी साधनं कुठे कशी केव्हा मिळतात आणि त्याचा आरोग्यास कसा उपयोग होतो या बद्दलची सर्व माहिती देण्यात आली.
रोटरी क्लब चे डिस्टिक गव्हर्नर हरीश मोटवानी यांची कन्या किरण मोटवानी यांनी  यंग जनरेशन मधील प्रातिनिधिक रूपात अतिशय परखडपणे आपले मत मांडले. आता मुलींनी आपल्या समस्या मोकळेपणाने मांडल्या  पाहिजे आणि चुपी तोडायला पाहिजे असे सांगितले कार्यक्रमाच्या प्रोजेक्ट चेअरमन बिंदू शिरसाठ होत्या अशी माहिती सेक्रेटरी देविका आणि गीता गिल्डा यांनी दिली सूत्रसंचालन देविका रेळे यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here