काळाबाजार विरोधी पक्षनेते फडणवीसांना चौकशीसाठी शहर भाजपाचा ई-मेल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, April 10, 2021

काळाबाजार विरोधी पक्षनेते फडणवीसांना चौकशीसाठी शहर भाजपाचा ई-मेल

 काळाबाजार विरोधी पक्षनेते फडणवीसांना चौकशीसाठी शहर भाजपाचा ई-मेल

रेमडेसिविरचा तुटवडा


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शहरात निर्माण झालेल्या रेमडेसिविर इंजक्शनचा तुटवडा दूर करावा तेसेच इंजेक्शनचा होत असलेला काळाबाजार थांबण्यासाठी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून अधिकार्‍यांची चौकशी करण्याचे निवेदन शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना इमेलद्वारे पाठवले आहे.
इमेलद्वारे पाठवण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, सध्या नगर शहर व जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरत आहे. नगर शहर हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने मोठे हॉस्पिटल या ठिकाणी आहेत. शहरासह तालुक्यातील रुग्णांचा कल या मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याकडे आहे. शुक्रवार दि.9 रोजी नगरच्या जिल्हाधिकारींनी वितरकांकडून रेमडेसिविर इंजक्शन ताब्यात घेऊन ते वेगवेगळे हॉस्पिटलला वितरीत केले.  हे वितरीत करत असताना ते कोणत्या कोणत्या हॉस्पिटलला केले याची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रेसला द्यावयास हवी होती. किंबहुना या गोष्टीचे त्यांनी नियोजन करायला पाहिजे होते. थेट हॉस्पिटलला न देता जिल्हा आपत्ती व्यवस्थापनात एखादा कक्ष उभारून त्या ठिकाणी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना किंवा दवाखान्याची डॉक्टरची चिठ्ठी घेऊन येणार्‍या व्यक्तीला सदरचे इंजेक्शन दिले असतेतर ते थेट रुग्णास उपलब्ध होत होते. मात्र तसे न करता त्यांनी सदरचे इंजेक्शन हे हॉस्पिटलला दिल्याने मोठ्या प्रमाणात याचा काळाबाजार मांडला गेला आहे. नागरिक अजूनही या इंजेक्शन साठी वणवण फिरत आहेत, ही बाब अत्यंत गंभीर आहे. या प्रकाराची तातडीने आपण चौकशी करावी व रेमडेसिविर इंजक्शनचा तुटवडा व काळाबाजार कमी होवून सदर इंजेक्शन कसे उपलब्ध होईल हे तातडीने पहावे.
दरम्यान शहरजिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी शुक्रवारी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन गोयल यांची दिल्ली येथे भेट घेवून नगर मध्ये उद्भवलेल्या परिस्थीची माहिती देवून तातडीने लक्ष घालण्याचे निवेदन दिले
शहर भाजपचे अध्यक्ष भैय्या गंधे, माजी शहराध्यक्ष वसंत लोढा, माजी नगराध्यक्ष अभय आगरकर यांच्यासह अ‍ॅड. विवेक नाईक, सचिन पारखी, अंजली वल्लकटी, सुरेखा विद्दे, महेश नामदे, महेश तवले, तुषार पोटे, उमेश साठे आदींचे नावे निवेदनावर आहे.

No comments:

Post a Comment