संकटकाळात एकमेकांना सहकार्य करण्याची गरज - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, April 10, 2021

संकटकाळात एकमेकांना सहकार्य करण्याची गरज

 संकटकाळात एकमेकांना सहकार्य करण्याची गरज

राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्यावतीने रक्तदान शिबीर - साहेबान जहागीरदार


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने केडगाव येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबीरात युवकांनी उत्सफुर्तपणे रक्तदान केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या अहवानाला प्रतिसाद देत आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पसंख्यांक विभागाचे सरचिटणीस शाहरुख शेख यांनी या रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार यांच्या हस्ते रक्तदान शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अजित कोतकर, सोफियान शेख, अब्दुल खोकर,  सलमान शेख, सोहेल सय्यद, समी सय्यद, नदिम शेख, जहीर पठाण, अस्लम सय्यद, आदिल शेख, मयुर अमोलिक, आकाश लोंढे, अभी काळे, नितीन शिंदे, साद सय्यद, इमरान शेख, जाकिर मनियार, शहेजाद खान आदींसह युवक उपस्थित होते.
साहेबान जहागीरदार म्हणाले की, रक्तासाठी मनुष्याला मनुष्यावरच अवलंबून रहावे लागते. रक्ताला जात, धर्म नसते. रक्तही मानवी जीवनाला मिळालेली अमूल्य देणगी असून, रक्त कोणत्याही पध्दतीने कृत्रिमरित्या तयार होत नाही. संकटकाळात माणुसकीच्या भावनेने एकमेकांना सहकार्य करण्याची गरज आहे. रक्तदान मोहीम व्यापक होणे गरजेची आहे. कोरोनाच्या संकटकाळानंतर मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर रक्तही मनुष्याच्या जीवनासाठी अत्यावश्यक बाब बनली असून, गरजू रुग्णांना जीवदान देण्यासाठी रक्तदानासाठी युवकांना पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. रक्तदात्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. शिबीर यशस्वी करण्यासाठी अर्पण ब्लड बँकचे डॉ.भाग्यश्री पवार, गणेश मोकाशे आदी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here