आ. लंकेंच्या कोव्हीड सेंटरला देश विदेशातून मदत ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, April 24, 2021

आ. लंकेंच्या कोव्हीड सेंटरला देश विदेशातून मदत !

 आ. लंकेंच्या कोव्हीड सेंटरला देश विदेशातून मदत ! 

वृद्ध, विधवा, निवृत्त कर्मचारी, विदयार्थीही सरसावले ! ५० लाख रोख जमा !



नगरी दवंडी

पारनेर  - कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी आमदार नीलेश लंके यांनी भाळवणी येथील नागेश्‍वर मंगल कार्यालयात सुरू केलेल्या शरदचंद्र पवार आरोग्य मंदीरासाठी देशविदेशातून दररोज मोठया प्रमाणावर मदत मिळत आहे. आतापर्यंत ५० लाख रूपये जमा झाले असून गावागावांमधून विविध प्रकारचे धान्य, भाजीपाला, फळे, अंडी, दुध आरोग्य केंद्रामध्ये आणून देण्यात येत आहे. 

विविध सोशल मिडियाच्या माध्यमातून आं. लंके यांच्या मोफत आरोग्य केंद्रांची महती देशभरासह सातासमुद्रापार पोहचल्यानंतर सर्व ठिकाणांवरून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या नागरीक थेट मदत करीत आहे. गुगल तसेच फोन पे च्या माध्यमातूनही दररोज लाखो रूपयांची मदत जमा होत आहे. या मदतीची सबंधित व्यक्तीला आयकरातून सुट मिळणार आहे. भाळवणीच्या आरोग्य केंद्रास भेट देउन अनेक नागरीक रोख रक्कम, धनादेश जमा करीत आहेत. तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी तब्बल ६ लाखांपेक्षा जास्त मदत आ. लंके यांच्याकडे सूपूर्द केली आहे. सेवानिवृत्तांनीही मदतीचा हात देताना एक लाख रूपयांची मदत दिली. विदेशातून अनेक तरूण थेट खात्यावर रक्कम पाठवित आहेत. 

आ. लंके देवदुताप्रमाणे काम करीत आहेत. अनेक विधवा,वृद्ध, सेवानिवृत्त कर्मचारी, विदयार्थी यांनीही आपल्या परीने मदत सुपूर्द केली आहे. अनेक सामान्य नागरीकांच्या संकटात आ. लंके नेहमीच धावून गेल्याने आता त्यांनी सेवाभावी वृत्तीने सामान्य रूग्णांसाठी सुरू केलेल्या या आरोग्य मंदीरासाठी असे अनेक लोक  शक्य ती मदत देउन उतराई होण्याचा प्रयत्न करीत आहे. आ. लंके यांच्या पुढाकारातून उभे राहिलेले हे कोव्हीड सेंटर सुरू झाल्यानंतर पारनेर, नगर मतदारसंघाबरोबरच जिल्हयाच्या विविध तालुक्यातील रूग्ण दाखल झाले आहे. रूग्ण दाखल करताना कोणताही भेदभाव केला जात नसून प्रत्येक नागरीकाची वैयक्तीक काळजी घेतली जाते. वर्षापूर्वी आ. लंके यांनी कर्जुलेहर्या येथे सुरू केलेल्या शरदचंद्र पवार आरोग्य मंदीरामध्येही साडेचार हजार रूग्णांवर मोेफत उपचार करण्यात आले. आ. लंके यांनी रूग्णांप्रती दाखविलेल्या या करूनेची दखल घेत आ. लंके यांच्या दुस-या आरोग्य मंदीरासाठी नागरीक मदतीसाठी उर्त्स्फुत पुढे आले आहेत. इच्छुकांनी आ. लंके प्रतिष्ठाणशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


कारखानदारांचा जिल्हा आणि फाटका आमदार 

साखर कारखानदारांचा जिल्हा म्हणून  नगर जिल्हयाची ओळख आहे. कोरोनाच्या महामारीचे मोठे संकट उभे राहिलेले असताना सहकारी साखर कारखानदारांनी रूग्णांसाठी कोव्हीड सेंटर सुरू करण्यासाठी पुढाकार घेतलेला नाही. याउलट अगदीच सामान्य कुटूंबातील नीलेश लंके यांच्यासारखा फाटका आमदार लोकसहभागातून बहुदा देशातील पहिले भव्य कोव्हीड सेंटर यशस्वीरित्या चालवित असल्याबददल नागरीकांकडून कौतुक करण्यात येत आहे.


प्रसन्नकुमार व सुनीलकुमार यांनी पाठविले प्रत्येकी १०० पौंड 

कोरोना महामारीवर मात करण्यासाठी आ. नीलेश लंके यांनी हाती घेतलेला हा उपक्रम इंग्लंडमधील प्रसन्नकुमार व सुनीलकुमार या भारतीय वंशाच्या नागरिकांनाही चांगलाच भावला ! दोघांनीही प्रत्येकी १०० पौंडची (प्रत्येकी १० हजार ५००) शुक्रवारी आ. लंके प्रतिष्ठानच्या खात्यावर वर्ग केले. इंग्लंडमध्ये वास्तव्यास असलेले हे दोघेही भारतीय वंशाचे नागरिक परप्रांतीय आहेत. तरीही त्यांनी आ. लंके यांचा हा निःस्वार्थ सेवाभाव पाहून मदत पाठवुन दिली. फेसबुकच्या माध्यमातून या दोघांना आ. लंके यांच्या या मोफत कोव्हीड सेंटरची माहिती मिळाली होती.

No comments:

Post a Comment