कोरोना रुग्णांसाठी सहकार अधिकाऱ्यांचाही मदतीचा हात ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, April 24, 2021

कोरोना रुग्णांसाठी सहकार अधिकाऱ्यांचाही मदतीचा हात !

 कोरोना रुग्णांसाठी सहकार अधिकाऱ्यांचाही मदतीचा हात !

तीन लक्ष किमतीचे औषधे देत दिले सामाजिक योगदान !नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी : 

 आमदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या व गोरगरीब रुग्णांना या कोरोणाच्या जागतीक महामारी मध्ये आधार मिळावा म्हणून मा. शरद चंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदिराची स्थापना करण्यात आली. गेल्यावर्षी कर्जुले हर्या याठिकाणीही आमदार लंके यांनी एक हजार बेडचे सुसज्ज असे मोफत आरोग्य मंदिर चालू केले होते . व त्या माध्यमातून किमान पाच हजार रुग्ण यशस्वीरित्या बरे होऊन घरी परतले होते . परंतु गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने भाळवणी येथे या आरोग्य मंदिराची स्थापना करण्यात आली व आजपर्यंत हजारो रुग्ण या रुग्णालयात मोफत उपचार घेत आहे . व आनंदाची गोष्ट म्हणजे कित्येक रुग्णांना बरे होऊन डिस्चार्जही देण्यात आलेला आहे .

         इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण या आरोग्य मंदिरात दाखल होतात त्यांना सर्व सुख सुविधा उपचार मोफत दिला जातो, त्यासाठी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या प्रमाणात या आरोग्य मंदिरास योगदान देत आहेत.

         आपणही समाजाचे काही तरी देणे लागतो या भावनेतून अहमदनगर सहकार विभागाचे मुख्य अधिकारी एकत्र येत आपणही या आरोग्य मंदिरास काहीतरी योगदान देऊन आपले सामाजिक दायित्व  निभवावे हा सामाजिक दृष्टिकोन ठेवत ,अन्नधान्य, पाणी बॉटल हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेले आहे . परंतु औषधाचा तुटवडा भासतो हे लक्षात घेता श्री.दिग्विजय आहेर साहेब ( जिल्हा उपनिबंधक अहमदनगर )

 यांच्या मार्गदर्शना खाली तसेच सुखदेव सूर्यवंशी ( सहाय्यक निबंधक पारनेर ) रावसाहेब खेडेकर ( साहाय्यक निबंधक श्रीगोंदा ) किरण आव्हाड (कार्यालय अधीक्षक अहमदनगर )सुधीर शेटे ( प्रमाणित लेखापरीक्षक अहमदनगर ) राजेश वाघमोडे (सहकार अधिकारी पारनेर ) जालिंदर बोरुडे घोगरगाव हे सर्व अधिकारी वर्ग एकत्र येत व आमदार निलेश लंके यांच्या या महायज्ञात मदत व्हावी म्हणून किमान तीन लक्ष रुपयाचे तुटवडा आहे असे रुग्णांसाठी अत्यावश्यक असणारे किमती इंजेक्शन व औषधे विविध ठिकाणांवरून या अधिकाऱ्यांनी जमा केले . व ते सदर औषधे आरोग्य केंद्रात सुपुर्द केले .आमदार लोकनेते निलेश लंके यांनी सर्व सहकार अधिकारी वर्गाचे या सामाजीक योगदाना बद्दल आभार मानले.व राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बाबाजी तरटे यांनी या आरोग्य मंदिरास सढळ हाताने मदत करून रुग्णसेवेसाठी हातभार लावावा, स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन केले.

      यावेळी सदर अधिकारी वर्गा समवेत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, गट विकास अधिकारी किशोर माने, डॉ . गंधे ,संदीप चौधरी, श्रीकांत चौरे, प्रमोद गोडसे , सुरज लोंढे,दत्ता कोरडे, मुकुंद शिंदे,योगेश शिंदे संगमनेर , संदीप रोहोकले ,संदीप भागवत, संतोष ढवळे, शिवाजी शिंदे, सर्व डॉ .वृंद यांच्यासह अनेक सहकारी मित्र यावेळी उपस्थित होते .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here