राज्यात आज रात्री ८ पासून कडक लॉकडाऊन. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, April 22, 2021

राज्यात आज रात्री ८ पासून कडक लॉकडाऊन.

 राज्यात  आज रात्री ८ पासून कडक लॉकडाऊन.नगरी दवंडी

मुंबई : राज्य सरकारकडून आज ब्रेक द चेन चे नवीन नियम जारी करण्यात आले आहेत, या नियमांनुसार राज्यातील लॉक डाऊन कडक होणार असल्याचं दिसून येत आहे. कारण अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांशिवाय आणि तसेच ठराविक वेळेत जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्याशिवाय घराबाहेर पडता येणार नाही आहे. 

एवढंच काय एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात काय, तर एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करता येणार नाहीय. लग्नात २५ पेक्षा जास्त लोकांची उपस्थिती असेल तर ५० हजारांचा दंड ठोठावला जाणार आहे. याआधी हा दंड फक्त १० हजार होता, त्यामुळे १० हजार रुपयात सुटका होत होती, पण आता ५० हजार आणि कारवाईचा देखील सामना करावा लागणार आहे. 

- लोकल ट्रेनमधून आता फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवास करता येणार आहे. तर 50 टक्के लोकांना उभे राहून प्रवास करता येणार. पण नियमानुसार ठोस कारण असावं.

- खासगी वाहतुकीसाठी फक्त 50 टक्के प्रवाशांना परवानगी देण्यात आली आहे. नियम मोडल्यास 10 हजारांचा दंड वसूल करण्यात येणार आहे.

- लग्नकार्यासाठी फक्त 25 लोकांनाच उपस्थित राहता येणार. 2 तासात लग्नकार्य उरकावे लागणार आहे.

- सर्व सरकारी कार्यालयांमध्ये केवळ 15 टक्के उपस्थितीनुसार कामकाज होणार आहेत. तर अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांना उपस्थित राहता येणार आहे. पण गरज पडली तर 100 टक्के कर्मचाऱ्यांना बोलवता येणार आहे.

- सरकारी कार्यालयांमध्ये १५ टक्के हजेरी - राज्य आणि केंद्रीय कार्यालयांसाठी हा नियम लागू

- २२ एप्रिल २०२१ ते १ मे २०२१ पर्यंत हा कडक लॉकडाऊन लागू असेल.

- लग्नाला २५ पेक्षा जास्त लोक उपस्थित राहिल्यास आता ५० हजारांचा दंड

- एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात आणि एका शहरातून दुसऱ्या शहरात ट्रॅव्हल्स सेवा बंद

- एका शहरातून जाण्यास परवानगी नाही, प्रवास केल्यास १४ दिवस होम क्वारंटाईन करणार, दंडात्मक कारवाई देखील होवू शकते. 

- अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवासाची भूमा

- एसटी बस, खासगी वाहनांमध्ये ५० टक्के प्रवाशांनी प्रवास करता येणार

- अत्यावश्यक सेवेशिवाय, तसेच ठोस कारणानेच प्रवास करा, किंवा घराबाहेर या, ठोस कारण नसल्यास प्रवास करणाऱ्यांना १० हजारांचा दंड

- प्रवासादरम्यान कुणालाही कोरोना सारखी लक्षणं दिसल्यास वैद्यकीय तपासणीनंतर कोरोना सेंटरला रवानगी होईल.

- किराणा, दूध, फळे, अंडी, मटण, भाजीपाला (जीवनावश्यक वस्तू) याविषयी नवीन नियमात कोणताही उल्लेख करण्यात आलेला नसल्याने सकाळी ७ ते ११ दरम्यान ही विक्री आणि खरेदी करता येणार आहे.

No comments:

Post a Comment