दिलासादायक... आज २३८४ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ३११७ बाधितांची रुग्ण संख्येत भर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, April 21, 2021

दिलासादायक... आज २३८४ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ३११७ बाधितांची रुग्ण संख्येत भर

 दिलासादायक... आज २३८४ रूग्णांना डिस्चार्ज तर  नव्या ३११७ बाधितांची रुग्ण संख्येत भरनगरी दवंडी

अहमदनगर: जिल्ह्यात आज  २३८४ रुग्णांना  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख २१ हजार ६२५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.७२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३११७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २१ हजार ९८९ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४२०, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ११७६ आणि अँटीजेन चाचणीत १५२१ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १७६, अकोले ०३, जामखेड ४८, कर्जत ०३, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण ३२, नेवासा ०६, पारनेर ४१, पाथर्डी १८, राहुरी ०२, संगमनेर ०३,  शेवगाव ०३, श्रीगोंदा १८, श्रीरामपूर ३२, कॅंटोन्मेंट बोर्ड ०८ आणि मिलिटरी हॉस्पिटल २६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ६०४, अकोले १४, जामखेड ०४, कर्जत १३, कोपरगाव २३, नगर ग्रामीण ९१, नेवासा १५,  पारनेर ४२, पाथर्डी २३, राहाता ९१,  राहुरी ४०, संगमनेर ९९, शेवगाव ०९, श्रीगोंदा २१, श्रीरामपूर ३८, कॅंटोन्मेंट बोर्ड १७ आणि इतर जिल्हा जिल्हा २९ आणि इतर राज्य ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज १५२१ जण बाधित आढळुन आले. मनपा ११८, अकोले ११६, जामखेड ५७, कर्जत १५३,  कोपरगाव ५२, नगर ग्रामीण २४५, नेवासा ८५, पारनेर ७४,  पाथर्डी ७९,  राहाता १५८, राहुरी ९४, संगमनेर २६, शेवगाव ४१ श्रीगोंदा ४७, श्रीरामपूर १५५, कॅन्टोन्मेंट बोर्ड १५ आणि इतर जिल्हा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये

मनपा ४९०, अकोले १२५, जामखेड ०९, कर्जत २७८,  कोपरगाव २८९, नगर ग्रामीण ८५, नेवासा ४६, पारनेर ११६, पाथर्डी १७७, राहाता १८२, राहुरी ११६, संगमनेर १३५,  शेवगाव १६८,  श्रीगोंदा ५२,  श्रीरामपूर ६४, कॅन्टोन्मेंट ४०, मिलिटरी हॉस्पिटल ०१ आणि इतर जिल्हा ११  अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:१,२१,६२५

उपचार सुरू असलेले रूग्ण:२१९८९

मृत्यू:१६५६

एकूण रूग्ण संख्या:१,४५,२७०

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

No comments:

Post a Comment