कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी वृद्ध शिक्षक पेन्शनरही मैदानात ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, April 22, 2021

कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी वृद्ध शिक्षक पेन्शनरही मैदानात !

 कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी वृद्ध शिक्षक पेन्शनरही मैदानात !

पारनेर तालुका पेन्शनर्स असोसिएशन कडून भाळवणी येथील आरोग्य मंदिरास एक लाख रुपये !



नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी ;

      कोरोना विषाणू चा वाढता संसर्ग लक्षात घेता महाराष्ट्रात भयाण परिस्थिती निर्माण झाली असल्या कारणाने या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार लोकनेते निलेशजी लंके यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या माननीय शरद चंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदिरात  मदतीचा ओघ मोठ्या प्रमाणात चालू आहे .ही महामारी इतकी मोठ्याप्रमाणात आहे की या जैविक युद्धात अनेक वृद्धांनी आपल्या कर्त्या पुरुषाला मुकावे लागले आहे. तर अनेक भगिनींचे सौभाग्य हिरावून घेतले गेले आहे. मायेचा हात देणारे अनेक मार्गदर्शक वृद्ध माता पिता या आजारात आपल्यातून निघून जाताना दिसून येत आहे .एवढी हृदयद्रावक परिस्थिती निर्माण झाली असताना आमदार निलेश लंके यांनी सामान्य जनतेला मदतीचा हात देण्यासाठी या कोवीड सेंटरची उभारणी केली आहे . 1000 सामान्य रुग्णांसाठी तर 100 बेड हे प्राणवायू देणाऱ्या रुग्णांसाठी उपलब्ध केले आहे .व सध्याची परिस्थिती अशी आहे कि ते ही पूर्णपणे भरले गेले आहेत या सामाजिक कार्यात अनेक दानशूर व्यक्तिमत्व, सामाजिक संस्था, उद्योजक, खेड्यापाड्यातून गावागावातून आपापल्या ऐपती प्रमाणे लोक योगदान देत आहेत गेल्या आठवड्यात शिक्षक अनेक संघटनांचे कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक सामाजिक शारीरिक योगदान उस्फूर्तपणे दिलेले आहे .

         आमदार निलेश लंके हे एका शिक्षकाचा मुलगा आहे . व अनेक वेळा तरुण व वृद्ध शिक्षकांनी त्यांना मदत केली आहे . आजतागायत किमान साडे सहा लक्ष रुपये शिक्षकांनी या आरोग्य मंदिरास जमा करून दिले. या पुर्वीही पुरग्रस्तांसाठी 55000 व गेल्या लाटेत कोव्हीड रुग्णांना मुख्यमंत्री निधीसाठी 65,000 रु. निधी दिला होता .व आता पारनेर तालुका पेन्शनर्स असोसिएशन्स पारनेर यांच्यातर्फे माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदिर भाळवणी येथे सर्व वृद्ध शिक्षक पेन्शनर्स कडून एक लक्ष रुपये इतके भरीव निधी उपलब्ध करून दिली . हा निधी तालुक्याचे आमदार निलेशजी लंके यांच्या हस्ते गुरुवारी धनादेशाच्या माध्यमातून सुपूर्द केले .

       यावेळी पारनेर तालुका पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष रंगनाथ बागल, सचिव विश्वनाथ कवडे, ज्येष्ठ मार्गदर्शक पोपट इथापे, ज्ञानदेव लंके गुरुजी यांच्यासह द.मा. ठूबे,भाऊसाहेब जगताप,दत्तात्रय भोसले, विलास औटी, चं.ब . काळे, आ. ग . पवार,अशोक रोकडे,स.द. थोपटे गे . म . जाधव , श्रीमती आढाव सौ . चेमट इत्यादी वृद्ध पेन्शनर्स उपस्थित होते .

No comments:

Post a Comment