कोरोणाविषयी जनजागृतीसाठी नेवासा पोलिसांचे संचलन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, April 26, 2021

कोरोणाविषयी जनजागृतीसाठी नेवासा पोलिसांचे संचलन

 कोरोणाविषयी जनजागृतीसाठी नेवासा पोलिसांचे संचलन 
नगरी दवंडी

वार्ताहर :नेवासा  

अहमदनगर जिल्ह्यामधील कोरोना या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नेवाशात ही आता रुग्णांची संख्या वाढत आहे  .त्यामुळे नेवाशातील नागरिकांमध्ये  जनजागृती म्हणून  नेवाशाचे तहसीलदार  डॉक्टर रूपेशकुमार सुराणा,  पोलिस निरीक्षक  श्री विजय करे , मुकिंदपूर चे सरपंच श्री सतीश (दादा )निपुंगे यांचे वतीने सर्व पोलिस कर्मचारी आणि उपनिरीक्षक यांचे समवेत नेवासा आणि नेवासा फाटा येथे संचलन करण्यात आले  आणि नागरिकांनी सरकारच्या निर्णयाचा आदर राखून घराबाहेर पडू नये जोपर्यंत कोरोनाची साखळी तुटत नाही तोपर्यंत सामाजिक नियमांचे पालन करावे  अशा सूचना यावेळी करण्यात आल्या .नेवासा प्रशासनाच्या या नवीन उपक्रमाचे सर्वच स्तरातून आता कौतुक करण्यात येत आहे .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here