पारनेर कारागृहातील दोन आरोपींकडे सापडले मोबाईल पोलीसा मार्फत गुन्हा दाखल... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, April 26, 2021

पारनेर कारागृहातील दोन आरोपींकडे सापडले मोबाईल पोलीसा मार्फत गुन्हा दाखल...

 पारनेर  कारागृहातील दोन आरोपींकडे सापडले मोबाईल पोलीसा मार्फत गुन्हा दाखल...


नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी

पारनेर पोलीस स्टेशनमध्ये दिनांक २५/०४/२०२१ रोजी १:३० वाजता दक्षिण विभागीय गस्त दरम्यान मा.उप विभागीय पोलीस अधिकारी श्री अजित पाटील सो नगर ग्रामीण विभाग अहमदनगर यांनी पारनेर पोलीस स्टेशनला भेट दिली भेटी दरम्यान त्यांनी दुय्यम कारागृहाची नियमीत तपासणी करण्यासाठी दुय्यम कारागृहाचे जेलर तथा तहसिलदार पारनेर, श्रीमती ज्योती देवरे, व पोलीस निरीक्षक श्री घनशाम बळप पारनेर पोलीस स्टेशन यांना अवगत केले व त्याप्रमाणे सदर अधिकारी व पोलीस अंमलदारांचे उपस्थितीत दुय्यम कारागृहाची अचानक नियमीत तपासणी केली असता तपासणी दरम्यान न्यायालयीन कोठडीमधील आरोपी सौरभ गणेश पोटघन व अविनाश निलेश कर्डीले यांचे ताब्यात दोन सॅमसंग कंपनीचे मोबाईल मिळुन आले आरोपीतांकडे मोबाईल बाबत विचारणा केली असता त्यांनी सदरचे मोबाईल हे भत्ता देणारे सुभाष लोंढे व प्रविण देशमुख दो.रा.सुपा ता. पारनेर जि. अहमदनगर यांनी दिल्याचे कळवित असल्याने पारनेर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं २५५/२०२१ कारागृहे अधिनियम १८९४ कलम ४२, ४५ (१२) सह भा.द.वि कलम ३४ प्रमाणे दिनांक २५/०४/२०२१ रोजी दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पो.स.ई. बालाजी पदमणे हे वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

No comments:

Post a Comment