मृत्यूनंतरही अंत्यसंस्कारासाठी विलंब , प्रेताची हेळसांड, दुजाभाव- संदेश कार्ले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, April 26, 2021

मृत्यूनंतरही अंत्यसंस्कारासाठी विलंब , प्रेताची हेळसांड, दुजाभाव- संदेश कार्ले

 मृत्यूनंतरही अंत्यसंस्कारासाठी विलंब , प्रेताची हेळसांड, 

दुजाभाव- संदेश कार्लेनगरी दवंडी

चिचोंडी पाटील ( प्रतिनिधी ) : नगर शहरातील कोविडमुळे,मृत झालेल्यावरील अंत्यसंस्कार विलंबाबाबत जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश तुकाराम कार्ले यांनी प्रांतअधिकारी नगर उपविभाग नगर यांच्याकडे मागणी केली आहे अशी माहिती पत्रकार सोहेल मनियार यांना दिली.

         नगर शहरात कोविडमुळे दररोज सुमारे ५५ ते ६० व्यक्तीचे मृत्यू होत आहेत आणि झालेत सुद्धा.यापूर्वी आपण कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे अंतिमसंस्कार महानगरपालिके मार्फत नगर येथील अमरधाम येथे करत आलो.परंतु काल अचानक नगर शहराबाहेरील नागरिकांचे अंतीमसंस्कार थांबवण्यात आल्याचे समजले .नगर शहराबाहेरील नागरिकांचे अंतीमसंस्कार कुणाच्या आदेशामुळे थांबविण्यात आले,की असे कोणतेही लेखी अथवा तोंडी आदेश कुणी सिव्हिल हॉस्पिटल अथवा महानगरपालिकेला दिले काय ? की असे अंतीमसंस्कार करू नये म्हणून कुणी निवेदन अथवा दबाव आणला काय ? असे माणुसकीचे दुश्मन नक्की कोण होते ? प्रशासन की इतर कुणी वास्तवात ह्या विलंबाबाबत मला शेंडी,भातोडी, रस्तापुर व इतर अनेक ठिकाणावरून मृत पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांचे फोन आले एक तर कोविड झालेल्या रुग्णांना बेड मिळणे बिल भरणे,आशा अनेक अवघड बाबी पार पाडत उपचार करतात  परंतु दुर्दैवाने रुग्ण मृत्यू नंतरही असे अतोनात हाल होणार असतील तर ते अत्यंत चुकीचे आहे .अंतीमसंस्कार केल्याने त्या भागात थोडेफार प्रदूषण होणार परंतु प्रदूषण काय फक्त ह्याच बाबीमुळे होते काय,इतर बाबी काहीच नाहीत काय,सीना नदीचे घाण पाणी,नाल्यामध्ये येणारे रक्ताचे पाणी,कचरा,ह्या बाबीही खूप आहेत वास्तविक अंतीमसंस्कार सुरू ठेवूनही उपाय योजना करता येतात,जास्त ठिकाणी आपण ती व्यवस्था काशी निर्माण करू शकतो यावर विचार करून निर्णय घेता आला असता परंतु कालचा प्रकार मृत पावलेल्या नगर शहराबाहेरील लोंकांच्या दृष्टीने घृणास्पद झाला,माणुसकीचे दुश्मन असल्या सारखा वाटला प्रशासन तातडीने निर्णय घेऊ शकते त्यांनी तो घ्यावा नक्कीच सर्व ह्या बाबतीत सहकार्य करतील कुणाचीही ह्या बाबतीत विरोध असण्याचे कारण नाही कारण ज्याला माणुसकी आहे तो विरोध करणारही नाही प्रशासनाने मात्र खंबीरपणे भूमिका घेऊन निर्णय घ्यावेत व मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांची व त्या व्यक्तीची मरणानंतर सुटका करावी हि विनंती.यानंतर नगर शहर व बाहेरील असा संघर्ष होणार नाही याची काळजी घ्यावी.अशी मागणी सर्व नागरिकांच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांनी प्रशासनास केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here