आमदार निलेश लंकेच्या महाकोव्हिड सेंटरचे काम राज्याला आदर्श - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, April 27, 2021

आमदार निलेश लंकेच्या महाकोव्हिड सेंटरचे काम राज्याला आदर्श

 आमदार निलेश लंकेच्या महाकोव्हिड सेंटरचे काम राज्याला आदर्श 

जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील

शरदचंद्र पवार महाकोव्हिड सेंटरला अधिक्षकांची भेट



नगरी दवंडी

पारनेर - प्रतिनिधी

गेल्या दोन वर्षाच्या कार्यकाळात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी कोव्हिड सेंटरच्या माध्यमातून हजारो कोरोना बांधीतांना दिलासा दिला असून महाकोव्हिड सेंटरचे काम आदर्श असल्याचे मत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी व्यक्त केले आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील व पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी मंगळवारी दुपारी कोव्हिड सेंटरला भेट दिली.यावेळी तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे प्रमोद गोडसे सुरज भुजबळ सत्यम निमसे मुकुंद शिंदे योगेश ‌शिंदे ( संगमनेर) संदीप वाघ शाम पवार यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.


यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी या कोव्हिड सेंटर मधील सोयी सुविधांचा आढावा घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्या कामाचे कौतुक केले. या कोव्हिड  सेंटर मध्ये रुग्णांना सकाळच्या नाश्त्यामध्ये अंडी शिरा पोहे दुपारच्या जेवणामध्ये मांसाहार व पालेभाज्या यांच्यासह फळे ते पाणी पिण्यासाठी बिसलेरी देण्यात येत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांनी अधीक्षक पाटील यांना दिली. तर दुसरीकडे जिल्हाभरातून हजारो रुग्ण सेंटरमध्ये दाखल झाले असून दररोज शंभरच्यावर पेशंट बरे होऊन आपआपल्या घरी जात आहे. त्यामुळे शरदचंद्र पवार महाकोव्हिड सेंटर गोरगरीब रुग्णासाठी आधार केंद्र बंद असल्याची प्रतिक्रिया जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील इतर तालुक्यामध्ये अशा सेंटरची उभारणी गरजेचे असल्याचे मत अधीक्षक मनोज पाटील यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment