गुंडेगाव आरोग्य उपकेंद्रात कोरोना लसीकरण मोहीम .. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, April 27, 2021

गुंडेगाव आरोग्य उपकेंद्रात कोरोना लसीकरण मोहीम ..

 गुंडेगाव आरोग्य उपकेंद्रात कोरोना लसीकरण मोहीम ..नगरी दवंडी

गुंडेगाव प्रतिनिधी:-

गुंडेगाव येथे कोरोना विषाणू चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य विभाग व प्राथमिक आरोग्य केंद्र वाळकी, व उपकेंद्र गुंडेगाव यांनी नागरिकांना योग्य सुविधा मिळावी या अनुषंगाने वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल ससाणे  यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडेगाव आरोग्य उपकेंद्रात  कोरोना लसीकरण मोहिमेचे आयोजन श्री रामेश्वर मंगल कार्यालय येथे करण्यात आले आहे, यावेळी परिसरातील ६० वर्षेच्या पन्नास  नागरिकांना लसीकरण करण्यात आले . तसेच कोरोना या संसर्ग रोगाला रोखण्यासाठी नागरिकांनी लसीकरण करावे  आसे आव्हान डॉ.अनिल  ससाणे यांनी व्यक्त केले आसून मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती पुढील काळात गुंडेगाव उपकेंद्र मार्फत गावातील प्रतेक नागरिकांना लवकरच लस उपलब्ध करून दिली जाईल आसे मत गुंडेगावचे उपसंरपच संतोष भापकर यांनी व्यक्त केले.

           याप्रसंगी वाळकी येथील आरोग्य अधिकारी  डॉ. ठाकूर शैलेजा, सी.एच.ओ डॉ.सोनाली चव्हाण,डॉ. प्रणाली पोटे, श्रीमती अंकाराम पी.एन. श्रीमती कोतकर ए.एस. श्री विलास दाताळ, श्री नेटके,श्री जगताप, श्री जाधव,श्रीमती रतन बुद्धिवंत, ग्रामपंचायत कर्मचारी शहाजी भापकर, या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले, यावेळी गावातील मा. जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, उपसरपंच संतोष भापकर, ग्रामपंचायत सदस्य संजय कोतकर, सुनील भापकर, सा.कार्यकर्ते  संतोष सकट, मा.चेअरमन महादेव चौधरी,  पत्रकार संजय भापकर, शिवनाथ कोतकर, राजेंद्र मोहिते,  संदीप जाधव,दादासाहेब आगळे,  माऊली कुताळ, ज्ञानेश्वर हराळ, यश चौधरी,  इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here