माका येथे कोवीड सेंटरचे उद्घाटन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, April 27, 2021

माका येथे कोवीड सेंटरचे उद्घाटन

 माका येथे कोवीड सेंटरचे उद्घाटननगरी दवंडी

माका प्रतिनिधी_नेवासे तालुक्यातील लोकसंख्येच्या हिशोबाने,तसेच शेवगाव,नेवासे,पाथर्डी या तिन तालुक्याच्या सिमेलगत असलेल्या माका या ठिकाणी  तारकेश्वर गडाचे मठाधीपती आदिनाथ महाराज शाश्री पाथर्डी यांच्या शुभहस्ते भाजपा पक्षाच्या जयहरी मित्र परिवार तसेच वायुनंदन मंडप परिवार,शिवमल्हार कलाॅथ सेंटर,यांच्या प्रयत्नातून,माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे तसेच युवा नेते सहदेव लोंढें यांच्या सहकार्यातुन  रासपचे नेवासे तालुकाअध्यक्ष दत्तात्रय शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोवीड सेंटरचे उदघाटन कोरोनाबाबतीत नियम व सूचनांचे पालन करुन वायुनंदन मंगल कार्यालयात करण्यात आले.                                                        कोरोना महासंकटामुळे भयभीत झालेल्या  परिसरातील जनतेसाठी या भागात कोवीड सेंटर झाल्याने एक मोठा दिलासा मिळाला असल्याने,सर्व संबधितांचे आभार गावचे माजी सरपंच गोरक्षनाथ घुले, सेवा सहकारी सोसायटीचे खंडुभाऊ लोंढें,पोलिस पाटील अशोक वाघमोडे,उपसरपंच कमलबाई लोंढें,यांनी मानले. याप्रसंगी सहदेव लोंढें,अमोल कोलते,संदीप दारकुंडे, संभाजी थोरात,राजेंद्र पागिरे,राजेंद्र आव्हाड,अमोल कोकाटे,भाऊ दारकुंडे,एकनाथ नवले ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक निमसे,सदस्य आदिनाथ म्हस्के,ज्ञानेश्वर सानप, दिपक आखाडे,कर्मचारी वर्ग,वायूनंदन परिवाराचे सुभाष औटी तसेच कर्मचारी,उपस्थित होते.यासंदर्भात विशेष सहकार्य भाजपा वैद्यकीय आघाडीचे डाॅ.मुळे,जाधव, फुलारी,कोलते,शिवमल्हार कलाॅथ सेंटरचे काळे यांचे लाभलेतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सानप सर यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here